रविवार, ३१ मे, २०२०
घुगऱ्या
' घुगऱ्या '
हुरडा पार्टी चुकली तर
काही हरकत नाही
आताही तोच स्वाद
आहे आपल्या नशिबी ,
ज्वारी हुरडयाचे
गोड सुखे दाणे
थोडे हरभरे
काही शेंगदाणे
भिजवून फोडणी देता
तयार पदार्थ खाण्या समोरी ,
कोथींबीर हिरवी पेरून
चवीसाठी लिंबू त्यावरी
रुचकर गरमागरम पौष्टीक
चविष्ट घुगऱ्या आपल्यासाठी ...
📝🌷🙏. संजय होनकळस
२४.०५.२०
डू ~ ढु ~ म ... मुटका
डू ~ ढु ~ म ... मुटका "
शेत हिरवे दूरपर्यंत
उंच दाट झाडांतून
पायवाट वाकडीतीकटी अरुंद
बांधावरून पोहचते सरळ
दगडी विहिरीच्या भिंतीपर्यंत
आकाशी हिरवे नितळ
झऱ्याचे पाणी स्वच्छ अविरत
कधी खोल - कधी उथळ काठ
उतरण्या पाण्यात पायऱ्या
खाचा कधी बांधलेला दोर
पाहून पाण्याला होतो
पोहणाऱ्याला पोहण्याचा मोह
अंदाज पाण्याच्या खोलीचा घेऊन
मित्रमंडळींसोबत काठावरून तयारीने
उड्या मारतो प्रत्येकजण पाठोपाठ
जाणकार मारतो अंदाज घेऊन सूर
नवख्याची असते बेडूक उडी हळूच
शिकणारा भोपळयासह पोहतो कडेलगत
पट्टीचा काठावरून मारतो ' मुटका '
पाणी उडते विहिरी बाहेर डू ~ ढु ~ म ...
संजय होनकळस
२६.०५.२०
हक्काचा मन कवडा जोडीदार
" हक्काचा मन कवडा जोडीदार "
हे उमजलंय मला ...
जोडीदार असला की
जीवन सोपं होतं ...
आवडीनिवडीचं दोघानांही
जास्तीच मिळतं ...
प्रसंगारूप व्यक्त होऊन
जमवून पाहता येतं ...
स्वप्नांना सत्यात आणताना
छानसं नातं बहरतं ...
प्रेम रंगांना वेगवेगळ्या
छटांचं इंद्रधनू फुलतं ...
आनंदासाठी मनकवडं
जिवलग मित्रत्व लाभतं ...
परिपूर्ण आयुष्य लाभण्या
हक्काचं माणूस मिळतं ...
पद्मा ~ संजय होनकळस
३०.०५.२०
विजया मावशी ची आठवण
श्री
विजयामावशीची उपस्थिती
होती मायेची सावली
प्रत्येक कार्यक्रमात
तिची होती हजेरी
तिच्यामुळे सर्वांना मिळे
आनंदाची शिदोरी
गप्पा गोष्टीत शिकवी
जगण्याची हातोटी
ईश्वराची भक्ती केली
सेवा दान करोनि
नात्यात एकोपा आणून
आपली छाप सोडली
आठवण तिची कायम
येईल प्रत्येकास पदोपदी .
शुक्रवार, २९ मे, २०२०
प्रेमाची उकल नव्याने होताना
" प्रेमाची उकल नव्याने होताना " ...
केव्हां केव्हां काहीच
बोलायचं नसतं
फक्त अनुभवायचं ...
निसर्गाशी जवळीक करून
शांततेची चाहूल ऐकायची
हालचाल पहायची ~ टिपायची ...
बदलणाऱ्या घटनांचे
साक्षीदार व्हायचं ,
दोघांनी एकांतात ...
खूप छान वाटतं ,
प्रेमाची उकल
नव्याने होताना ...
जीवनाला सजवण्यात ,
नाते दृढ होऊन
सर्व सुकर होत जातं ...
संजय होनकळस .
२९.०५.२०
शुक्रवार, २२ मे, २०२०
' बाजारहाट '
श्री
' बाजारहाट '
पाकिट पिशवी यादी घेऊन
कधी नव्हे ते मी
निघालो बाजारहाटला
भेटले बरेच जण ओळखीचे
आज काय विशेष ?
विचारू लागले बोलताना ,
मंडईच ती वर्दळीची
आरडाओरडा नित्याचाच
भाजी ताजी निवडलेली
काही ठिकाणी सुकलेली
काय घ्यावे - किती घ्यावे ?
भाव मला करता येईना !
किराणा घेतानाही चुकलो
यादी राहिली बाजूला
पंचाईत होता गोंधळून
बोबडी लागली वळायला
सौ च्या आदेशानुसार ही
खरेदीत हिशोब काही जमेना !
पिशव्या काठोकाठ भरल्या तेव्हा
एकट्याला उचलता येईना ,
ह्यात उशीर होऊन जाता
सौ चा फोन वाजू लागला सारखा
फोन घ्यावा की पिशव्या पकडाव्या
त्रासून घरचा रस्ता पहिला पकडला ,
बाजारहाट काय तो
एकदाचा मला समजला
नंतर घरी उद्भवलेला प्रसंग
न सांगितलेलाच बरा
तुमचाही काहीसा अनुभव असणार
हे ही नको वाचणाऱ्याला सांगायला .
कवी : संजय होनकळस
१९.०५.२०
कविता - काव्य - गीत
🌷 श्री 🙏
' कविता - काव्य - गीत '
शब्द सागरातून उत्स्फुर्तते
कवितेची स्पंदनेरुपी लाट
मन भूमीला स्पर्शता
न्हाहून निघाले भाव ,
अलंकारीत शब्द जसे
शंख शिंपले मोती
काव्यशिड नाव विहारते
जसे जीवन प्रसंगी ,
शब्दांना मिळते झळाळी
चंद्र सुर्येसम प्रज्ञेची
क्षितिज भेटती अंतरंगी
कवितेचे स्फूरावे गुणगान ,
आल्हाद हवेवर स्वार
शब्दांची लय मंजुळ
मन हिंदोळ्यावर काव्याची
वृक्षहिरवी सावली किनार ,
शब्द प्रगटता संवादे
जीवनाची अविभाज्य रत्ने
गुंजन प्राणिमात्रास सदैव
शब्द आकारे गीतकार ...
🌿☘️ 📝 संजय होनकळस
२०.०५.२०
सोमवार, १८ मे, २०२०
कोकिळेची प्रेमाला साथ
' कोकिळेची प्रेमाला साथ '
कोवळे ऊन येतायेता
कोकिळा आली सांगायला
जाशील नारे आज तिला भेटायला ,
तसा निरोपच घेऊन आले आहे
मी सांगायला ...
पहा कशी फुलली आहेत
मोगऱ्याची फुले
वाऱ्यात सुगंधाने जाण आणली आहे
तिलाही आवडतो मोगरा
माहीत आहेच तुला ...
भेटीच्या वाटेवर गुलमोहर बहरलाय
लाल फुलांनी रस्ता सजलाय ,
सोनचाफा देखील मेहेरबान झालाय
तिच्या वेणी साठी फुले नेशील म्हणून
फुलांचा सडा चौहोबाजूस पडलाय ...
कैरीच्या फोडी , चिंचा , चनामना
गप्पागोष्टीत खायला आवडतो तिला
तुझ्या तोंडून तिला आवडणारे गाणे
ऐकायला आवडते तिला
हे सारं लक्षात ठेव भेटताना ...
तिची व्याकुळता घे लक्षात आता
मी पाहते - जाणते आहे तुम्हां दोघांना
टेकडीच्या वनराईत बोलता येईल तुम्हांला
सूर्यास्त पाहून निघून जा आपापल्या घराला
मी कोकिळा साथ देईल तुमच्या प्रेमाला ...
संजय होनकळस .
१६/०५/२०२०
मॅटिनी शो १२:०० वा
' मॅटिनी शो १२ : 00 वा 📽️ 🎞️ '
दोन तिकिटे मॅटिनीची 🧾
आणली तुझ्या माझ्यासाठी ,
वेळेवर पोहचण्यासाठी
फोन करू आधी , 🏢
कोल्ड्रिंक पॉपकॉर्न घेऊन 🍿
बाल्कनीत बसू नेहमीच्या जागी ,
स्वप्नवत असला सिनेमा तरी 🥳
आनंद मिळतो जगण्यासाठी ,
हिरो हिरॉईनच्या छबी मध्ये 👫
पाहतो एकमेकांची पर्सन्यालिटी ,
तसं काहीतरी अंगिकरण्याच्या 🕺💃
प्रयत्नात असतो आधी ,
गाणी गातो , बागेत फिरतो 🎼
फिरतो देशविदेश पासपोर्ट नसतानाही ,
शॉपिंग , हॉटेलिंग मनसोक्त करतो 🛍️.
विना खर्च , दोन तासांची मॅटिनी ...
कवी : संजय होनकळस , ९८५००३९७६६
१८.०५.२०२०
शुक्रवार, १५ मे, २०२०
ललित : कायनेटिक होंडा
श्री
" कायनेटिक होंडा "
तशी प्रत्येकाची इच्छा असते , कॉलेज मध्ये जावू लागल्यावर आपल्याकडे २ व्हीलर असावी , मित्रमंडळींच्या मध्ये जरा भाव खाता येईल आणि रुबाब काय तो अनुभवता येईल . तेव्हा अशी इच्छा पूर्ण होईल असे वाटले नव्हते .
पण योग मात्र होता .
पॉलिटेक्निक कॉलेज दीड दोन किलोमीटर होते , पायी जाणे येणे तसे सोपे होते , वाटेत मित्र भेटायचे , गप्पा मारत कॉलेज - घर कधी येत असे समजत देखील नव्हते .
दररोज दुपारी कॉलेजच्या लंच टाइम मध्ये घरी जेवणासाठी जाणे व्हायचे , जेवून कॉलेज लेक्चर असेल तर जाणे व्हायचे .
असेच एकदा डॉक्टर आजोबांना ST स्टँडवर सोडण्यासाठी गाडी घेऊन जाण्याचा योग आला .
त्या दिवशी नेमका मामा काही कारणास्तव घरी नव्हता . मला विचारणा झाली , मी म्हंटले मला जमेल पण नंतर कॉलेज आहे . आजोबा म्हणाले मला सोडून कॉलेज कर आणि कॉलेज झाल्यावर गाडी व्यवस्थित घरी घेऊन जा .
हाच तो योग . मग काय , मी आजोबांच्या मागे बसून स्टँडवर पोहचलो , त्यांनी मला गाडी सुपूर्त केली , मी इतका आनंदित झालो की बस ...
काळ्या रंगाची , सोनेरी पट्टे असलेली , ऑटोमॅटिक गियर ची गाडी माझ्या हातात होती , ऑक्सेलेटर पिळला की गाडी सुसाट पळायची . मला तरी हवेत चाललो की काय असे वाटले . अंगात थोडी उर्मी आली .
कॉलेज च्या गेटमधून आत जाताच सर्वांचे लक्ष माझ्याच कडे होते , प्रत्येक जण येऊन विचारपूस करीत होता ,
माझा भाव थोडा वधारला होता . ' ऐट ' काय ते आपोआप माझ्या कृतीतून येत होते . पण हे नकळत होत होते . काहींच्या नजरेत माझी इमेज वाढली होती . त्यावेळी सरांच्या कडे फक्त २ व्हीलर असायच्या , विद्यार्थ्यांकडे नाही .
आजोबा - मामा यांचा मुळे हा योग आला होता .
त्याकाळी जपानी तंत्रज्ञानाची ऑटोमॅटिक गाडी चालवायला मिळणे म्हणजे दुर्मिळ योग . नंतर हा योग बऱ्याच वेळा आला , पण पहिल्या वेळेची कॉलेज मधील
" कायनेटिक होंडा " राईड कायम लक्षात राहिली . आज ह्या लातूर मधील गोष्टीला ३० वर्षे होत आलीयेत .
संजय होनकळस .
९८५००३९७६६
आभासी की खरा हवा
आभासी की खरा हवा ...
खरच आहे सारे हे
आभासी सुख आता बोचते ,
हरवलेल्या संवादाचे
मोल आज कळते ,
उणिवच होती ती जीणे
नाते विणने शिकविले होते
एकमेकांत मिसळुनी खरे
' जगणे काय ते ' अनुभूविले होते ,
कधीच नव्हती स्पर्धा - इर्षा
होती आपलेपणाची आशा
तुटपुंज्या सोयी असूनही तेव्हां
भागवल्या एकमेकांच्या गरजा ,
सांपत्तिक रस्त्यावर धावताना मात्र , आता
मागे पडल्या आनंदाच्या छोट्या वाटा
काय जगलो ? लिहावे म्हंटले तर
कागद राहतो नेहमी अर्धा कोरा ,
किती तरी प्रश्न उत्तरा विनाच आज ...
वेळेच्या चक्रावलीत मी , भरकटलो मात्र ,
काय हवे ? किती हवे ? या जगण्याला ...
आभासी - खऱ्या जगण्याचा अर्थ आता तरी कळावा .
संजय होनकळस . 🙏🌷 २४.3.२०२०
९८५००३९७६६
ओरल ~ Oral
' ओरल ' 🤔 🗣
प्रत्येकाचीच ओरल
प्रश्न ? विचारल्यावर असते ,
शाळेतली अभ्यासावर तर
जीवनातील अनुभवावर असते ,
काही उत्तरे मार्कांसाठी तर
काही समाधानासाठी असते ,
शाबासकी किंवा नामुक्षी
अपेक्षित उत्तरावर ठरते ,
स्वतःला सिद्ध करायला ...
पदोपदी ओरल द्यावी लागते .
🙏🏻🌷✌👍📝
संजय होनकळस २०/०२/२०
सबका मालिक एक
खूप छान 🌷🙏🏻📝🌱
सबका उपरवाला मालिक एक
हेच लोकांना उमजत नाही ,
ज्यांनी दिलय चंचल मन
त्याच कोड उलगडत नाही ,
शिस्त , संस्कार , नीतिमत्ता
अंगवळणी का कोण रुजतच नाही ,
प्रत्येकाचा अडमुठपणा
एक - दुसऱ्याला खाईत लोटी ,
संत , गुरू , पालक , मास्तर
आणि बाई
माणसाच्या लालसेला कमी पडी ,
जीवनाचं उद्दिष्ट काय ?
हेच माणसाला कळत वळत नाही ,
सुंदर जगाला विद्रुप करण्यात
प्रत्येकाच्या विनाशाची येतेय समीप घडी...
संजय होनकळस
बडबड गीत
काल खाल्ले होते मलाई पेढे
विस्मृतीत गेलेले मला आठवले पाढे ,
आत्याला आवडते देवभक्ती
तिनेच शिकवली मला देवाची आरती ,
आईला वाटते यावे स्पर्धेत प्रथम
सर्वात छान व्हिडीओ पाठवणार मी प्रथम ,
वक्तृत्व कला देईल संजीवनी सर्वांना
चैतन्यज्योत जीवनात देईल प्रकाश ...
खूप शुभेच्छा
संजय होनकळस
हीच वेळ ' Made in India '
हीच वेळ , " Made in India "
आता माझी वेळ आली आहे ,
स्वतःतील उर्जेला सिद्ध करण्याची ,
नामी संधी मला दिसत आहे
देशासाठी अलौकिक करण्याची ...
स्टार्ट अप इंडिया , उद्योग उभारून
फिनिक्स पक्ष्याच्या बळाने झेप घेण्याची ,
छोटा मोठा उदयोग - व्यापार - कारागिरी
कुशलतेच्या अदाकारीने व्यापून टाकण्याची ...
मी नवीन गोष्टी शिकूण , सरावाने
मला हे येते , या विश्वासाने लढण्याची ,
हे मी सिद्ध करून दाखवू शकतो ,
म्हणण्याची , करून दाखवण्याची ...
उज्वल भवितव्यासाठी बदल घडविताना
एकजूट , देशाभिमान , कास जनकल्याणची ,
औद्योगिक -औषधी - शेती - तंत्रज्ञान प्रगती
निसर्गा सोबत सांभाळू आरोग्य सर्वांची ,
प्रत्येकाच्या सहभागाने हासिल होईल
अर्थाजन- निर्यात - सबलीकरण आपल्या देशाची ,
परावलंबन सारून सहजप्राप्त होवू शकते
भारतीयांचे स्वावलंबन घडवत सत्यात महासत्तेची ,
" Made in India " विश्वासाहर्ता पेलण्याची
जबाबदारी आता प्रत्येक संविधानकर्त्याची ,
विश्वकल्यानाच बीज भारतीयांकडेच आहे , सिद्धता
वसूधैव कुटुंबकमची नीती जगाला शिकवायची ...
संजय होनकळस , ०२/०४/२०२०
९८५००३९७६६
प्रेमाच्या चारोळ्या : श्री सौ करिता
🌷
साधेपणातील वाढदिवस
जास्त मला भावला
दिखाऊपणा आज नसताना
प्रेमाच्या धारेने केक तू कापला .
🌷🌷
किती दिवसांनी तुझी छबी
पहिल्या सारखी दिसली
बागेत भेटताना भेटली होती
तशीच आज पुन्हा तू लाजली .
🌷🌷🌷
वाढदिवसांचे प्रसंग
भावनेचे तरंग आणतात
एकमेकांच्या आनंदाने
जीवन सुखकर करतात .
🌷🌷🌷🌷
साडी आणि दागिन्याने
तुझ्या सौंदर्यात भर पडते
प्रेमळ स्वभावाचे तुझे वागणे
मनापासून मला भावते ,
🌷🌷🌷🌷🌷
तुझे गाने गुणगुणने
पैंजनाने ताल धरणे
माझ्या प्रेम भावनेने
तुझ्या डोळ्यात प्रगटने ,
🌷🌷🌷🌷🌷🌷
तू रुसून हट्ट करावा
केसुत गजरा मी माळावा
शहारून तेंव्हा प्रेमाला
मोहर फुलून यावा ,
श्री आणि सौ यांच्या साठी .
🌷🙏🎂🍫🎉🎸🍹
कोरोनाची दुसरी बाजू
" कोरोनाची दुसरी बाजू "
एक बाजू आहे भयावह
दुसरी बाजू असू शकते पूरक ,
लुटणाऱ्या मनुष्य टोळीला
केले आता निसर्ग दूता ने बंदिस्त ,
जे चक्के नव्हते थांबणारे
भीतीने ते बिनशर्त थांबले ,
मोकळ्या हवेला आज
प्रदूषणाने नाही छेडले ,
नेहमीचेच टाळणारे बिलंदर
सबबी न सांगता बोलले ,
पायात ज्यांच्या चक्री
ते घरी निवांत बसून राहिले ,
कुटुंबाला हवे असलेले नाते
आपसूकच सहवासाने भेटले ,
आपलीच आपल्याला एकांताने
जीवन काय ते ? समजावले ,
श्रेष्ठत्व घेण्याचे जीवावर जेव्हा बेतले
' निसर्गा पुढे नाही कोणी ' हे सर्वांना उमजले ,
भौतिक समृद्धी आहे बिनकामची आज
खरे जगणे माणुसपणात , प्रेमात अनुभवले ,
पंच तत्वाना सांभाळणे किती महत्वाचे
' गरजांना कमी करणे हेच ' ध्येय भविष्यातले ,
पृथ्वी एकच , मनुष्याने एकसंघ बांधले जावे
नंदनवन काय ते , मग दिसेल सर्वांना फुललेले ...
कवी : संजय चं होनकळस ,
९८५००३९७६६ , २६ मार्च २०२०
असे का असावे ?
श्री
कविता : असे का असावे ?
प्रत्येकाचे असे का असावे
विचार केला का कधी ?
ठसा अंगठ्याचा वेगळा
डोळ्यातील रचना पहाना
हातातील रेषा छोट्या मोठ्या
चंचल मनाचा नाही ठावठिकाणा
असे का असावे
विचार कधी केला का ?
बुद्धीच्या विविध पातळ्या
आवडीनिवडी नानातऱ्हेच्या
स्वभावाच्या न बदलणाऱ्या कळा
प्रेम व्यक्त करणाच्या वेगवेगळ्या अदा
असे का असावे
विचार कधी केला का ?
रक्त गट ही विभागलेला
बोली भाषेतील लेहजा
कर्म कर्त्यवाच्या वाटा
जन्ममृत्यूच्या वेळ तारखा
असे का असावे
विचार कधी केला का ?
काही उणे काही जास्त
निसर्ग नियमच्या आराखडयात
विपुल सारे - बांधील नियोजन
विविधतेतील मर्म प्रत्येकाचे जीवन
असे का असावे
विचार कधी केला का ?
संजय होनकळस १६/४/२०
सोबत असावी एकमेकांची
असंच वाटत प्रत्येकाला 🌱
एकाच बागेत वाढावं
झाडान वेलीन सदा ,🌿
दूर वर जरी वाढत असलो
तरी पाहता यावं सदा ,🌳
ऋतूंच्या बदलत्या ओघात
' आहोत ' ... ह्या आशेवर
खुश राहता यावं सदा ,☘️
उभारी घेण्याच्या वेळात पहिल्या जाणिवेच असावं
आवडीचं प्रेमाचं बळ सदा ,
विस्तारलो असलो तरी 🌴
जपून ठेवलाय तोच
पहिल्या प्रेमाचा अंकुर सदा ...🌲
📝🌷🙏संजय होनकळस
झाड आणि वेल
🌱
असंच वाटत प्रत्येकाला
एकाच बागेत वाढावं
झाडान वेलीन सदा ,🌿
दूर वर जरी वाढत असलो
तरी पाहता यावं सदा ,🌳
ऋतूंच्या बदलत्या ओघात
' आहोत ' ... ह्या आशेवर
खुश राहता यावं सदा ,☘️
उभारी घेण्याच्या वेळात पहिल्या जाणिवेच असावं
आवडीचं प्रेमाचं बळ सदा ,
विस्तारलो असलो तरी 🌴
जपून ठेवलाय तोच
पहिल्या प्रेमाचा अंकुर सदा ...🌲
📝🌷🙏संजय होनकळस
प्रेमाच्या चारोळ्या
🌴🌻
प्रेमाच्या लहरी
उसळूनी याव्यात
मनाने मनाला
त्या पोहचवाव्यात ...
🌱🌹
तसेही तुझे माझे मन एकमेकात आहे गुंतलेले
उचकीसरशी इश्श म्हणताना
तुझे छान लाजणे मी जाणले .
🌿🌷
आपल्या पहिल्या भेटीतच
डोळ्यात सामावून घेतले तुला
दुरावा कदाचित आला जरी
हेच भरपूर जगण्यासाठी मला .
☘️🌷
उगाच आपण झुरतो
भेट लवकरच होणार
प्रेमासाठी ग्रीष्म सोसल्यावर
श्रावणसरी आपल्याला भिजवणार .
📝🙏🌷 संजय होनकळस
२१/०४/२०
नवरोबा शेफ
इतर वेळीचा नवरोबा
चांगलाच शेफ झाला
कांदा पोहे बनवत
घरचा भीम झाला ,
शेंगदाणे टपोरे लाल
मिरची कडीपत्ता चविष्ट
पेरून कोथींबीर हिरवी
खोबरे घातले वर ,
बोलवावे मित्रांना खायला
पोह्यांबरोबर चहा कप
तारीफ ऐकून सर्वांची
स्नॅक्स सेंटर उघडेल .
संजय होनकळस
🙏🌷😀👍
निसर्ग
' निसर्ग '
निसर्ग सजीवांना प्रेरक
बहरता प्रत्येक वृक्ष ,
कळ्या फुलांच्या गुच्छानी
उल्हासितता उमलते रंग
पाकळ्यांच्या रांगोळी सड्यांनी
वाटा होतात फुलांकीत
पसरतो हवेत सुगंध
अल्ह्यादतो भाव स्पर्श ,
निसर्गाचे फुलते यौवन
संचारतात पक्षी मुक्त
हिरव्यापानातुन गाते बुलबुल
किलबिल ऐकणे श्रवणीय ,
शोभितो फुलतुरा आकाशास
जलाशयात प्रतिबिंबते फुल
भूमि नाहते दवअत्तर
अग्नीला समिधाचे पुष्प ,
सोनेरी किरणाचा प्रकाश
लुकलूकतात फुले चांदण्यासम
पौर्णिमेत विलोभनीय दृश्य
स्वर्गाहुन सुंदर निसर्ग ...
संजय होनकळस
२७.०४.२०
मधूशाळेचे दुकान आणि चाहते
🍺 🍻 🍾
' मधूशाळेचे दुकान आणि चाहते '
सोमरसाचा अर्क जो
मोहिनी घालितो मनाला
पहात नाही एकदा तरी
करमत नाही त्याला ,🍷
दोन घोट हवे त्यासी
न्हारीच्या संगतीला
दिवस मग जातो चांगला
फिकीर नाही जगण्याला ,🍷
मधूशाळेच्या वाटा आपसूकच
सापडतात तळीरामांना
देतो साथ कोणीही
जो दर्दी असे त्यातला , 🍷
पैसे असो नसो खिशाला
उधारी - मैत्री येते कामाला
आज तो उद्या स्वतः
प्रत्येकजण जागतो शब्दाला , 🍷
पहिला घोट घशी उतरता
पळून जातात अडचणी
आनंदाच्या होतात वार्ता
दोन चार पेग पिल्यावरी ,🍷
भेटीगाठी चर्चा खुशाली
मधुशाळा जागा सोयीची
कधी देशी कधी विलायती
शौकिनांना हवी मधूशाळा उघडी . 🥃 🍷
📝 संजय होनकळस
०३.०५.२०
कोरोनासाठी सावधगिरी
जर मला विचाराल की
असशील का रे तू उद्या घरी ?
मी नक्कीच सांगेल
होय असेल मी .
आणि तू पण ...
मी जसा घरी राहतो तसा
तू घरी राहिलास तर ...
' शहाण्या माणसा '
पण जर तू ...
अधर्माने वागलास ,
नियमांच उल्लंघन केलस ,
बेफिकिरी तुझ्या वागण्यात आली ,
खोट बोलून दिशाभूल केलीस ,
संकटाच गांभीर्य घेतलं नाहीस ,
तर ...
कोरोना बाधित्यांच्यामध्ये
प्रथम तू येवून तुझी लागण
तुझ्याबरोबर राहिल्याने
तुझे कुटुंब , सहकारी ,
तुझे आजूबाजूचे , चाळीतील ,
अपार्टमेंट मधील गावातील , नगरातील ,
देशातील नागरिकांचे जीवन उध्वस्त होईल .
तुझ्या एका चुकीची शिक्षा
दुसऱ्यांचे जीवन संपवतील ,
तुझ्या हट्टी आणि अज्ञानामुळे ,
तू विषाणू संसर्ग बाधित होशील ,
तसाच इकडून तिकडे फिरत राहिलास तर ,
जो की मृत्यूचे थैमान घालणारा
विषाणू प्रसारक म्हणून
हीनवला जाशिल , बदनाम होशील .
असे म्हंटलेले आवडेल तुला घरच्यांना ?
तू आणि तुझ्या सारख्यांमुळे
सरकारी कर्मचारी , पोलीस ,
डॉक्टर , नर्स , ब्रदर्स ,
स्वच्छता कर्मचारी ,
सर्व जण दिवसरात्र एक करून आधीच्या
कोरोनाग्रस्त रुग्णांना औषधोपचार करीत
त्रास सहन करीत सेवा पुरवित आहेत - राहतील
कित्येक दिवस घरी न जाता
फक्त माणुसकीचे कर्तव्य मानून .
त्यांनी किती दिवस असे काम करायचे ?
लॉकडाऊन असेच जास्त वाढले तर ...
अर्थव्यवस्था कोलमडेल ,
नोकरी - छोटे - मोठे व्यवसाय ,
शेती - आयात - निर्यात थंडावेल ,
सर्वांचे नुकसान होईल .
शिक्षण , उन्नती , पोटापाण्याचा प्रश्नाने
देशाचे अतोनात नुकसान होईल .
कधी हिशोब करण्याचा प्रयत्न केलाय ?
जवळची पुंजी संपल्यावर काय ?
प्रश्नांची उत्तरे अजून माहिती नाहीत .
आशावाद असलेतरी जगभरात
नंतर सुधारणा होण्यास वेळ लागेल ...
ह्याचा विचार तरी कधी केलाय ?
देशाचे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने
लपवाछपवी न करता जर कोणाला
लागण झाली असेल तर सामोरे येवून
उपचार घेऊन बरे होऊन घरी जावू शकता .
नको रे असा वेडया सारखा वागू ,
भाजी , धान्य घेण्यासाठी नको गर्दी करू ,
सोशल डिस्टन्स पाळून करू सहकार्य
शहाणपणाच नातं जोड पाहू आचारणाशी ,
लसीकरनाचे प्रयत्न चालू आहे जगती
काळजी घेणे हेच आहे कर्तव्य आधी ,
घरात राहणं सध्या आहे जरुरी
कोरोनाचा नाश करू , दूर राहूनि
विजय मिळवू सर्व मिळुनी .
संजय होनकळस
०८/०४/२०२०
होम मिनिस्टर
🌿🌷
होम मिनिस्टर
संकटाचे निराकरण चुटकीसरशी व्हावे
सर्वांच्या आवडनिवडीचे तिला उमजावे
आनंदी वातावरण सहज सांभाळावे
मुलांचे संगोपन तिलाच जमावे
घराचे घरपण तिच्यामुळेच खुलावे
सांगा ,
अजून काय पाहिजे जीवनात .
लक्ष्मीनारायण
🌿🌷
' लक्ष्मीनारायण '
ठेवणीतले कपडे घालून
सणावाराला बाहेर पडावे
देवदर्शनाच्या वाटेवर जाताना
परिचितांच्या मुखातून यावे
लक्ष्मीनारायणाची जोडी शोभतेय ...
सांगा ,
अजून काय पाहिजे जीवनात .
कौतुक
🌿🌷
' कौतुक '
पाहुणे यावेत घर भरून जावे
पाहुणचार घेताना त्यांना प्रसन्न वाटावे
आनंदाच्या कला साहित्याच्या गप्पा करताना
आपलेपणाच्या भावनेने नाते दृढ व्हावे
निरोप घेताना सौभाग्यवतीचे कौतुक करावे,
सांगा ,
अजून काय पाहिजे जीवनात .
गुडीपाडवा
🌿🌷
' गुडीपाडवा '
गुडीच्या भरजरी वस्त्रावर
कडुलिंबाची हिरवीगार डहाळी
फुलांच्या- साखरेच्या हारासोबत
तांबे भाड्यावर कुंकूममोहर शकुणाची
नववर्षाच्या स्वागतास ओवाळणीकरण्या
कुटुंबासोबत सोनेरी किरणांची रांगोळी .
सांगा ,
अजून काय पाहिजे जीवनात .
प्रेमळ हाक
🌿🌷
' प्रेमळ हाक '
सकाळच्या प्रसन्नतेत
रेडिओची सुरावट ऐकावी
पक्षांच्या किलबिलतामध्ये
अहो , ऐकलत का ...
येताय ना चहा घ्यायला .
तिची प्रेमळ हाक कानी पडावी .
सांगा ,
अजून काय पाहिजे जीवनात .
प्रेम काय ते कळू दे मला
🌷☘️
प्रेम काय ते कळू दे मला
तुला भेटल्या पासून
तुच माझ्या मनात , 👩🦰
कुठलीही गोष्ट
तुझाच संदर्भ देते
त्यातही मला रमायला होते ,🎼
तू मोहिणी आहेस की अप्सरा 💃 👩🏻🦱
मी पुरता झालोय
आता खुळा,
तुला खुश पाहण्यातच
मी आसुसलेला , 🥰
प्रेमाचं काय ते ?
भेटून सांगशील ना मला ...🥳
🙏🌷📝 संजय होनकळस
०४.०५.२०२०
उन्हाळ्यातील सुट्टी
कविता : उन्हाळ्याची सुट्टी
खूप वर्षे लोटली आता
शाळा कॉलेज सोडून तुला मला
तू प्रत्यक्ष दिसते फक्त
तू सुट्टीत गावी येते तेव्हां ,
वेशी बाहेर पडणारा रस्ता
भेटवत असे आपल्याला
त्याच ठिकाणी आजही
थांबायला आवडते मला ,
वडाच्या पारंब्या गर्द सावली
ज्या देवळात जायच्या तुम्हीं मैत्रिणी
ते देऊळही मला खुणावते
तू देवळात असल्याचा मला भासवते ,
उरुसात गावात उत्साह असायचा
दोघांकडेही पाहुण्यांच्या भेटीगाठी व्हायच्या
खरेदीला तुम्हीं बाजारात दिसायच्या
आजही फेऱ्या मारतो आशेने बाजाराच्या ,
दिवाळीत गाव उजळून निघायचा
फराळाच्या ताटल्या घरोघरी जायच्या
तुम्हीं ही नटून शुभेच्छा द्यायला यायच्या
याही वर्षी याल हीच असते नेहमी प्रतीक्षा ,
ST आजही येते पाटीवर सकाळ संध्याकाळ
मी ही जातो येतो त्याच वेळेला हमखास
तू ही येशील उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटीला
मलाही लागेल त्याच वेळी सुट्टी उन्हाळ्यात ...
संजय होनकळस
०६.०५.२०२०
पौगंडावस्थेतील ठेव
' पौगंडावस्थेतील ठेव '
पौगंड वयातील ती ठेव
आहे खूप अनमोल
आकर्षण म्हणा किंव्हा
अजाणत प्रेम ,
सृष्टी ने प्रत्येक सजीवाला
दिलेलं आहे अनमोल बीज
हृदयात असत कायमच
मन निपजत आवडीनं आजीवन ,
तारुण्यात पर्याय येतात खूप
व्यवहारी जग ठेवीला ठेवत झाकून
आतून येतो मग आवाज
बीज फुलवेल तुझे जीवन ,
स्वप्नावत देते साथ जास्त
आवडी निवडीत देते कौल
एकांतात अवतरते आभासीरुपात
आतल्या ठेवीच ते सजीवपण ,
काव्य , लेखन , चित्र , संवाद
प्रभाव असतो निःसंशय
तो - ती चे ठेवीरुपी अस्तित्व
जीवन करते प्रफुल्लित ,
उत्सुकता , इच्छा , एक झलक
जाणून घ्यावे एकमेकांस
परत जावे पौगंडावस्थेत
सांगावे , पहा कसे जपले आहे ठेवीस .
कवी : संजय होनकळस
शब्द काव्य
शब्दांना काव्यरूपी
भावनांच्या गजऱ्याने
साजशृंगार केसुत
माळण्यास सांगावे ,
आवडीच्या ठिकाणी
चांदण्यात फिरताना
खळखळणाऱ्या पाण्यावरून
गारव्याने स्पर्शावे ,
डोळ्यातील बोलाला
हृदयाने जाणावे
एकमेकांच्या मिठीत
प्रेमाने गुणगुणावे ...💐
संजय होनकळस
तिच्यासाठी
💐
तुझं असणंच
माझ्यासाठी लाख मोलाचं ,
सूर्य उगवताच
तुझं शुभ चिंतायचं ,
फुलवारी पाहताना
तुला त्यात पहायचं ,
आनंदाच्या वाटांना
नेहमी तुझ्याकडे पाठवायचं ,
तुझ्या समाधानासाठी
आम्हीं नित्य जगायाचं ...
संजय होनकळस
१४/०५/२०२०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
" यंत्रमानवाकडे वाटचाल "
" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...
-
तो मी नव्हेच चा आविर्भाव " सभ्यतेच्या मुखवट्या आड लालसेचा दडलेला काळा साज विश्वास ठेवावा कसा सर्व स्तरांवर हा प...
-
' निसर्ग ' निसर्ग सजीवांना प्रेरक बहरता प्रत्येक वृक्ष , कळ्या फुलांच्या गुच्छानी उल्हासितता उमलते रंग पाकळ्या...
-
" मनुष्य : रंग बदलणारा प्राणी " खंडप्रांतियात वसलेला विविध वर्णाचा माणूस स्वभावाने अनोखा शरिरयष्टीने उंच काही खुजा , क...