श्री गणेश प्रसन्न
' मा. प्राचार्य वसंत केशवराव बिरादार मामा '
सरस्वतीचे उपासक सारे
ज्ञान तारती जीवन
गुरू ठरतात वंदनीय
जे करतात उत्तम मार्गदर्शन ,
समाजाला घडवितात दोघे
पहिली आई दुसरे शिक्षक
नाव निघते सर्वी कडे
जे करितात त्यांचे आचरण ,
वाणिज्य शाखा गणितीची आकडेमोड
ते समजते ज्याला तो ठरतो हुशार
आवडीचे व्रत सांभाळले तुम्हीं खास
प्रचार्यांचा मान हा तुमचा सन्मान ,
पत्नीच्या साथीने जमून आले सर्व
चित्रकलेच्या छंदात तुम्हीं जाता रमून
शिष्यांनी तुमचे नाव केले सार्थक
पंचक्रोशीत तुम्हीं आहांत विद्याशील ,
तुमच्यांकडे पाहून जगण्याला येतो हुरूप
सहवास तुमचा हवाहवासा वाटतो प्रत्येकास
तुमच्या आदर्श तत्वांची उजळणी करता
आयुष्याची वाट होते आनंदाने सुकर ...
कवी : संजय होनकळस
२४.०२.२१