शनिवार, १० जानेवारी, २०२६

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

पंचाग दिनदर्शिका सांगे
सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन
शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र
तो होतो एक तास उशिरा दररोज ,

शेतातील खुडलेला भाजीपाला
गावकऱ्यांना मिळतो ताजा लगेच
शहरातील माणसांना तो मिळतो शिळा
कोमजलेला , शिंपडनी केलेला दररोज,

स्वच्छ ताजी शुद्ध मोकळी हवा
खेडेपाडी श्वासोश्वासासाठी सहज उपलब्ध
शहरातली प्रदूषित दमट धुरकट मात्र
आरोग्यासाठी हानिकार घ्यावी लागते दररोज ,

नैसर्गिक क्षारयुक्त पिण्याचे पाणी नदी
विहिरीत तलावात सहज असते उपलब्ध
शहरात मात्र कृत्रिमरीत्या शुद्ध केले असल्याने
तब्येत बिघडवणारेच मिळते , प्यावे लागते दररोज ,

आकाश जमीन डोंगर दऱ्या हिरवे रान
गाई म्हशी बैल पशुधनाची खेड्यात होते भेट
शहरी करण्याच्या रेट्याने दूर सारून या गोष्टींना
यंत्रमानव होऊन जगावे लागते आहे दररोज ...

©® कवी : संजय होनकळस , पुणे
१२ डिसेंबर २५ फोन ९८५००३९७६६ 


पद्मा संजय यांचे मॅरेज ॲनिवर्सरी


पद्मा संजय  मॅरेज ॲनिवर्सरी २०२५

ऋणानुबंध एक अनमोल भेट
तु येता जीवनात
जुळून आले ऋणानुबंध
कळू लागले प्रितीचे क्षण
बहरले अवघे जीवन ,
तु म्हणजे आधार
तु म्हणजे विश्वास
तु म्हणजे आनंद
तु म्हणजेच माझा श्र्वास ,
२२ वर्षांची साथसोबत
पुढे ही अशीच राहील
तुझ्यासाठी मी आणि माझ्या साठी तु
ही रेशीमगाठ आयुष्याची अनमोल भेट.

कवी  : संजय होनकळस ,                                        १५ डिसेंबर २५ 


" अक्षय शुभेच्छा "


"  अक्षय  शुभेच्छा  "  ( नवीन इंग्रजी वर्ष ).                    

पंच तत्वांची घेऊया काळजी
आपल्या आरोग्याची देईल तो हमी ,

भारतीय परंपरेची जपूया पद्धती
संस्कृती देईल सौख्याची अनुभूती ,

स्नेही नातेपरिवारांशी जपूया मैत्री
आयुष्यात येईल आनंदाची समृद्धी ,

कला साहित्याशी असावी गट्टी
आंतरिक शांती चैतन्याशी होईल बट्टी ,

देशहितासाठी राहू दक्ष समर्पित नेहमी
अभिमानाने जगता येईल या लोकी ,

काळाचा महिमा सर्वांच्या हितासाठी
त्याच्याशी सुसंगता देईल समाधानाची तृप्ती .

©® कवी : संजय होनकळस
९८५००३९७६६ निगडी पुणे.

" मराठी मायबोली भाषेचा जागर "

" मराठी मायबोली भाषेचा जागर "

होती , आहे , या पुढेही राहील
प्रज्ञेची आपली अभिजात मराठी भाषा
शतकानुशतकांचा इतिहास सांगतो
वैभवशाली प्रवास मराठी भाषेचा ,

मायबोलीतून देतो गीता संदेश ज्ञानेश्वरी माउलींचा
अभंग ओवी गाथा बोधक रचना तुकारामांच्या ,
मनाचे श्लोक विवेकी काव्य समर्थ रामदासांच्या 
संत महात्म्यांचा उपदेश देते ग्रंथ मार्गदर्शिका ,

छत्रपती शिवाजी महाराजांची सुराज्य शासन भाषा
फुलेंच्या शाळेत शिकवली गेली मराठी भाषा
अविट रसाळ रांगडी माधुर्याची व्यवहारी भाषा
सारस्वतांच्या / साहित्यीकांच्या लेखणीतून समृद्धी पावली मराठी भाषा ,

महाराष्ट्र भूमीत प्राकृतातून रुजली बहरली
संस्कृतासोबत मराठी देवनागरी लिपीची भाषा
भारत मातेच्या हिता साठी सदैव उभा
मराठी बोली भाषेचा शाश्वत समृद्धीचा बाणा ,

कला नाट्य चित्रपट व्याख्यान मालिका
सर्वत्र प्रगल्भता / शहाणपण देती रसिकांच्या मनाला
मराठी भाषा घडवित आली पिढ्यानपिढ्यांना
साहित्य संमेलनाने घडतो जागर मराठीचा .

जागर मराठी भाषेचा , जागर मराठीचा ,                  जय मराठी .


© ® कवी : संजय होनकळस, पुणे
१२/१०/२५ फोन ९८५००३९७६६ .

( २/१/२६ सायंकाळी ६.०० वाजता
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
सातारा.‌ महाराष्ट्र.) 


बालभारती

     " बालभारती "
" सा विद्या या विमुक्तये " 
घेवून बोधवाक्य उद्देश पूर्ती ,
भाग्यविधाती बालभारती
विद्यार्थ्यांना घडवित जाती ,
भाषा विज्ञान गणित इतिहास
सोप्या भाषेत शिकविती ,
धडे कविता कथा चित्रे
ज्ञान आनंद खूप देती ,
घ्यावेत संस्कार जीवनमूल्ये
जे माणूस म्हणून घडविति ,
सुजाण शिक्षित व्हावे सारे
या ध्येयाने कार्य सदा चालविती ,
व्हावे शिक्षक साहित्यिक तज्ञ
जे भारत देशाला मार्ग दाखवती ,
उज्वल भविष्यासाठी सखा सोबती
आपली सर्वांची महाराष्ट्राची बालभारती ...

©® कवी : संजय होनकळस , निगडी पुणे,
दि .०९/०१/२०२६ फोन: ९८५००३९७६६ .



" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...