कविता : ' भावनांचे दालन '
तुझ्या खुशी साठी
आणला मी चंद्र ,
पहा झाडाला हळुवार
ठेवलाय टांगून ,
तुझ्याच सारखा तो ही
निखरलाय सुंदर ,
प्रेमाच्या ओराने
सजले आहे आकाश ,
प्रीतीच्या लहरींचे
अवतरले पाण्यावर तरंग ,
फुलांनी झंकारून
पसरविला सुगंध ,
अशा एकांतवेळी
भावनांचे खुलले दालन ...
© कवी : संजय होनकळस
१२ / ०८ / २१