शनिवार, २७ जुलै, २०२४

वारीचा क्षण - सुखाचे बोल "

 " वारीचा क्षण  -  सुखाचे  बोल  " 

मनाची  ओढ  थांबता  थांबेना 
पंढरीची  वाट  खुणावते  पावलांना ,
सावळा  श्रीहरी  भावतो   सर्वांना 
संतांची  शिकवण  ज्ञान  देते  मना , 
वैष्णवांचा  मेळा  वाटतो  आपला 
पताका  घेवून  नाचतो  भक्त  हरीचा  , 
भेदाभेद  नाही  सर्व  सोबती  सखा 
प्रत्येकांच्या  ओठी  ओवी  अभंगांच्या  रचना ,
इंद्रायणी  चंद्रभागेत  सोडून  द्यावा  व्यथा 
तृप्त  व्हावे  चक्षु  अंतरंग  निर्मळ  पुन्हा ,
दिंडीतील  रिंगण  देवळाचा  कळस  पहावा 
ध्यास  एक  दर्शन  व्हावे  पांडुरंगाचे  एकदा ,
राम  कृष्ण  हरी  सर्व  व्यापून  उभा 
विठ्ठल  विठ्ठल  जय  हरी  विठ्ठल  मुखी  म्हणा  , 
आषाढी  कार्तिकी  वारकऱ्यांचा  सण  हा  मोठा 
ज्ञानोबा तुकाराम  बोल  उच्चारता  सुख  लाभते जीवा .
© कवि : संजय होनकळस , पुणे 
०५/०७/२४ फोन : ९८५००३९७६६


एकमेवाव्दितीय क्रिकेटर - सुनील गावस्कर


" एकमेवाव्दितीय क्रिकेटर  -  सुनील गावस्कर " 

आघाडीचा फलंदाज तो  ( १९७१ साली सुरुवात ) 
१२५ कसोटी सामना खेळला ( १९८७ साली निवृत्ती ),
२९ शतकांना मागे  टाकून ( सर डॉन ब्रॅडमन ) 
३४ शंभरीचा प्रथम  राजा झाला ,
धावा १,५०,१००,२०० करीत त्याने 
सर्वात आधी १०,००० धावांचा इतिहास रचला , 
कसोटी सामने खेळताना  सरासरी 
५१.१३ ने तो धावा करीत राहिला , 
क्षेत्ररक्षणात  ही  चपळ - दक्ष  राहून 
१०० झेल  झेलणारा  मानकरी  तो  ठरला , 
एकदिवसीय  १०३ सामने खेळताना 
१९८३ चा  विश्र्व चषक  जिंकून आणला , 
चमकदार कामगिरी साठी १९७५ साली अर्जून पुरस्कार व
पद्म भूषण १९८० साली भारत सरकारने प्रदान केला , 
विस्डेन पुरस्काराचा १९८० मध्ये तसा 
२००९ मध्ये ही आय सी सी सन्मानित तो झाला , 
 गावस्कर -  बॉर्डर  नावाचा  चषक  सामना  
त्यांच्या सन्मानार्थ क्रिकेट  समितीने  चालू  केला ,
उंचपुऱ्या गोलंदाजांना समोर धैर्यवान हा 
५'६" उंचीचा असूनही ' लिटील मास्टर ' ने नावाजला गेला , 
सनी म्हणून  खेळाडूत  प्रसिद्ध असताना 
समीक्षक  समालोचनातही आता तो निपुण ठरला , 
आत्मचरित्र सनी डेज , चित्रपटात गीत गाऊन ( १० जुलै २४ ला )
७५ री साजरी करताना शंभरी कडे आनंदाने निघाला ...
© शब्द पुष्प :  संजय होनकळस  , पुणे 
०९/०७/२०२४ फोन ९८५००३९७६६ .

डोंगर पावसाचा खेळ "

" डोंगर पावसाचा खेळ " 
पावसाळ्यात  ढग डोंगरावर  खेळण्यास  उतरतो 
येताच  क्षणी  त्याला  बाष्पाने  आच्छादीत करतो 
डोंगर ही त्यांची  खोड काढीत गारवा निर्माण करतो 
खट्याळ ढग डोंगराला  पावसाने न्हावू माखू  घालतो 
डोंगर ही मग पावसाला धबधब्याच्या रुपी खाली ढकलतो 
 तुषार  हवेत  मस्त  उडत  नाचत  इंद्रधनुष्यात  प्रगटतो 
अधे मधे ढग दऱ्याखोऱ्यात उतरुन लपतो 
डोंगराला तो  झाकून स्वतःहाचेच अस्तित्व दाखवतो 
डोंगर ही  पावसाला  गुपचूप अंतर्गत  सामावुन  घेतो 
झऱ्या रुपी  त्याला  पाझरत  महिनोन्महिने ठेवतो 
ह्या खेळात  डोंगर  हिरवागार टवटवीत  होतो 
पावसाळ्यात  डोंगर  आभाराने  त्याला  फुले भेट  देतो 
हे भाग्याचे क्षण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतो 
दरवर्षी  दोघांना मनसोक्त खेळण्यासाठी परवानगी असते 
निसर्ग माता  हे  पाहून  उल्हासित आनंदित  होते ...
© कवी : संजय होनकळस , पुणे 
१९/०७/२४ फोन ९८५००३९७६६ 

मनुष्य : रंग बदलणारा प्राणी "

" मनुष्य  :  रंग बदलणारा प्राणी  " 
खंडप्रांतियात  वसलेला 
विविध वर्णाचा  माणूस 
स्वभावाने अनोखा   
शरिरयष्टीने उंच काही  खुजा ,
कर्मासाठी  परिपूर्ण  घडवलेल्या 
तरी फुकट आळसात अडकलेला 
जातीपातीत विखूरलेला
एकोप्यातील उन्नतीला झिडकारणारा ,
विविधेत  बोली भाषेचा लहेजा पाळणारा 
वसुधैव  कुटुंबकम् ला सावधतेने  जाणारा 
खाणंपाणं वातावरणाशी मिळताजुळता 
मनुष्यप्राणी विचारांचा राजा ,
काही अंशी षडरिपू ने भरलेला 
काही संत महात्मा ने वागणारा 
जगण्याचा अर्थ कळलेला 
काहींचा धरणीला भार असलेला , 
माणसाला जन्माला घालून 
वरचा ही गोंधळलेला पस्तावलेला 
चेहाऱ्यावरचा भाव एक अंतरंग वेगळा 
परिस्थितीनुसार रंग बदलणारा प्राणी जगावेगळा. 
© कवी : संजय होनकळस , पुणे 
२०/०७/२४ फोन ९८५००३९७६६ .

कल्पकते साठीचे पारितोषिक "


" कल्पकते साठीचे  पारितोषिक "
एकांतात असताना मजला 
कल्पकतेने  खेळण्यास बोलविले 
आणि सुचविले ,
जे आहे तुजपाशी  किंवा  आजूबाजूशी 
त्यातून काय करुन दाखवशील ? 
पाहू आज , हवंतर परिक्षा समज  ...
खरंच  मी  निरखून  पाहिले  जेव्हा 
थोडा विचार हि  केला 
मावळत्या  सूर्याला  मी  केंद्रबिंदू  ठरविले , 
जास्वंदीच्या  तुऱ्यात  बसवून  चमकताना  पाहिले 
एका  फुलाला  लटकून  दिवा  बनवून  दाखविले 
पानावर ओघळणारे  सोनेरी  दवबिंदू  टिपून  घेतले 
झोपाळ्यावर  झूलताना  हातात  त्यास  झूलविले 
हिरव्या  पानाच्या  टोकावर  सूर्य फूल  बनविले 
फुलाच्या डोक्यावर घेऊन  प्रतिबिंब खाली  पाडले 
क्षितिजाच्या  कक्षेतून  पाण्यात  उतरुन त्यास खूलविले 
आभासी करित त्याला  फुलदाणीत सजविले 
हे सर्व करताना मला खूप भारी वाटले ,
खेळताना खेळ असा  मला  भारावले 
हे पाहून सारे कल्पकतेने मला  
नव्या  दृष्टिकोनातून  पाहण्यासाठीचे  
आनंदाचे पारितोषिक दिले...
रचना : संजय होनकळस , पुणे 
२१/०७/२४ फोन ९८५००३९७६६ 

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...