" पृथ्वीचा पाचू "
जंगल हा पृथ्वीचा
पाचू म्हणून संबोधतो
प्राणीमात्रांना तो स्वच्छंदी
अंगाखांद्यावर सांभाळतो ,
हिरव्या वृक्षांनी बहरताना
रंगांची उधळण करतो
फुले फळे वेलींनी
तारुण्यात सदा राहतो ,
सहयोगी म्हणून मिरविताना
जमिन आकाशाला जोडतो
प्राणवायूचा पोशिंदा तो
माणसाला जगण्या सहाय्य करतो ,
अनमोल वनसंपदा सदा
सृष्टीचा जीवन सखा
युगानुयुगे आश्रय दाता
सृष्टीचा तो दागिना ...
© कवी : संजय होनकळस