" स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं
आतुरस्य विकार प्रशमनम् "
धन्वंतरी देवता निर्मित
चरक सुश्रुत ऋषींचे योगदान
ऋग्वेद अथर्ववेदात उल्लेख
आयुर्वेद उपचार संस्कृती प्रसिद्ध ,
प्रकुपित त्रिदोष सप्तधातू निवारण्यास
इंद्रिय - मन - आत्मा यांचा साधण्या समत्व
निसर्गाच्या सान्निध्यातले जिन्नस उपयुक्त
जिवामृत आहे पंचमहाभूतांसोबत कार्यरत ,
दिनचर्या ऋतूचर्या अष्टविध परीक्षणांती
व्याधी परीपेक्ष आयुर्वेद प्रणालीत प्रचलित
पथ्यापथ्य पंचकर्म नैसर्गिक औषधी सत्व
व्याधींवर अचूक इलाज गुणकारी पध्दत ,
रसौषधी भेषज कल्पनांचे सखोल ज्ञान
रुग्ण उपचारांसाठीचा पाच पिढ्यांचा प्रपंच
आरोग्य धनसंपदा लाभावी प्रत्येकास
हेच वैद्य आयुर्वेदाचार्यांचे सेवा व्रत .
© ® कवी : संजय होनकळस , पुणे .
०३/०५/२०२५ फोन ९८५००३९७६६ .