गीत शीर्षक : पुस्तक पुस्तक पुस्तक
समाज मांगल्य पुस्तक || धृ ||
( ताल कहरवा / रुपक/ दादरा )
ज्ञान वर्धिते पुस्तक
अज्ञानातून वाचविते पुस्तक
विद्यार्थी घडविते पुस्तक
प्रगल्भता वाढविते पुस्तक ... || १ ||
विज्ञान शिकविते पुस्तक
वाङ्मय खुलविते पुस्तक
धर्मशास्त्र समजाविते पुस्तक
संस्कृती उजळविते पुस्तक ... || २ ||
संस्कार चालविते पुस्तक
जीवन फुलविते पुस्तक
सृष्टी दर्शविते पुस्तक
समाज जागविते पुस्तक ... || ३ ||
© ® कवी : संजय होनकळस , पुणे .
२५/०८/२५ फोन ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा