बुधवार, २१ मे, २०२५

"  मातृत्व  जगी  सर्वश्रेष्ठ "

 "  मातृत्व  जगी  सर्वश्रेष्ठ "

तुझा  हक्क  तुझा  निर्णय 
स्त्री  तुला  माता  होण्याचा  अधिकार ,
तुझ्या  तील  ममत्व 
ह्याला  जगी  नाही  तोड ,
तुझ्या  संगोपनात 
बालकांची  होते  जडणघडण , 
तुझ्या  उदात्त  संस्कारांनी 
नवीन  पिढी  घडते  सुज्ञ , 
प्रपंच  नेटका  
करण्या  तुझा  हातखंड , 
प्रेम  माया  वात्सल्याची  
उपाधी  " माऊली "  शोभते  तुझं ,
पिढी  दर  पिढी  
तुझीच  रूपे  घडविती  जना ,
मातृत्व  आहे  जगती 
सर्वश्रेष्ठ  पुरस्कार  स्त्री  तुला .
© ® कवी : संजय  होनकळस , पुणे 
११/०५/२५ फोन ९८५००३९७६६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...