" वळण "
सोड तो काठ
दलदलीचा प्रदेश
बिन अर्थाच्या वागण्याला
दे चांगले आता वळण ,
उभारी च्या जाज्वल्य तेला
घे मनात ठासून
सुलगु दे ठिणगी आता
न थकता उषःकालापर्यंत ,
वेळ वय पुन्हा
कधीच येत नाही परत
प्रत्येक टप्प्यावरचं जगणं
फुला सारख सुगंधा सह बहरावं ,
जन्माच सार्थक करण्याची
तुझ्यात आहे धमक
धैर्याची कास सर्वदा
मिळवून देईल साध्य ,
सर्वांमधील असूनही
तु वेगळा आविष्कार
टाक दिपवून जगा
नाव घेतील तुझे आदरानं ...
कवी : संजय होनकळस , पुणे
२१/०८/२३ , फोन ९८५००३९७६६ .