" मनुष्य : रंग बदलणारा प्राणी "
खंडप्रांतियात वसलेला
विविध वर्णाचा माणूस
स्वभावाने अनोखा
शरिरयष्टीने उंच काही खुजा ,
कर्मासाठी परिपूर्ण घडवलेल्या
तरी फुकट आळसात अडकलेला
जातीपातीत विखूरलेला
एकोप्यातील उन्नतीला झिडकारणारा ,
विविधेत बोली भाषेचा लहेजा पाळणारा
वसुधैव कुटुंबकम् ला सावधतेने जाणारा
खाणंपाणं वातावरणाशी मिळताजुळता
मनुष्यप्राणी विचारांचा राजा ,
काही अंशी षडरिपू ने भरलेला
काही संत महात्मा ने वागणारा
जगण्याचा अर्थ कळलेला
काहींचा धरणीला भार असलेला ,
माणसाला जन्माला घालून
वरचा ही गोंधळलेला पस्तावलेला
चेहाऱ्यावरचा भाव एक अंतरंग वेगळा
परिस्थितीनुसार रंग बदलणारा प्राणी जगावेगळा.
© कवी : संजय होनकळस , पुणे
२०/०७/२४ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा