' वाढ दिवसाच्या शुभेच्छा '
💐 २१.०२.२१ 🎂
' कलाकारी नाना '
कुशलतेचि घेऊनि कस्तुरी
जन्मले सोलापूर नगरी
मनी ओढ नाविन्याची
गाठली पुण्य नगरी ,
टाटा मोटार नोकरी
प्रामाणिक वर्तने बढती
कलासागर तर्फे कलाक्षेत्री
कौतुक नाव मिळविले ,
चित्रकला - मूर्तिकला - पेटीवाद्य
कलाउपासक ध्यास नवा नेहमी
उल्हास वेगळा चैत्यन्याचा
कौटुंबिक जिव्हाळा साथ देई ,
समाधाने वृत्ती मदतीचा हात
सुखी संसाराला पत्नीची साथ
आयुष्याला सजवण्या सोबती
भटकंती वाङमय - साहित्य लाभले ,
जीवनात सात्विकपणा खरा
घेऊन आल्या सुखाच्या वाटा
आनंद वर्धिष्णू क्षणाक्षणा
साथ अशीच लाभावी सर्वदा ...
कवी : संजय होनकळस
(संकल्पना : समस्त परिवार ...)