मंगळवार, ९ मार्च, २०२१

निसर्गाची मुलगी


" निसर्गाची  मुलगी " 

जखडून  ठेविल्या  वाटा 
लादली   अनेक   बंधने
उर्मिचा  दाबून   घोट 
स्वप्नांचे  छाटिले  पंख 
कसा  होईल  उद्धार  
जिच्यामुळे  चालला  हा  संसार 
स्त्रीपणाला  घेवू  दयात  मोकळेपणाने  
' स्व ' चा  स्वतःचाच  श्वास 
फुलेल  दुनिया  सारी  
निसर्गाची  ही  आहे  मुलगी  ...

कवी : संजय होनकळस .
 निगडी , पुणे  , ०८/०३/२१ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...