तो मी नव्हेच चा आविर्भाव "
सभ्यतेच्या मुखवट्या आड
लालसेचा दडलेला काळा साज
विश्वास ठेवावा कसा
सर्व स्तरांवर हा प्रश्न ज्वलंत ,
तडजोडीचा हात हाती
कित्येकांची चक्रव्युहाची चाल
कामाचे तीन तेरा झाले तरी
हिस्सेकरी नामानिराळे राहतात ,
नमक हलाल ते हराम
संधी साधूचे कौशल्य
स्थळ असो वा देश धर्म
रंग बदलणारे हे गद्दार ,
आभासी प्रतिबिंब ते
तो मी नव्हेच चा आविर्भाव
निर्लज्जम सर्वदा सुखी
कलियुगातील वास्तव अवघड ...
© ® कवी : संजय होनकळस, पुणे
१२/०५/२५ , फोन ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा