' आनवी ' भाग्यशाली परी
नवीन रत्न अवतरले
लक्ष्मी पावले घेऊन
सुखाची ही चाहूल
आली आपल्या परिवारात ,
सजवला पाळणा छान
फुगे फुल माळा लावून
गाणे गायल्या आत्या
नातेवाईकांना मिळाला मान ,
साजेसे आवडणारे नाव
' आनवी ' ठेवले बरश्यात
आई बाबा आजी आजोबा
आनंदाने झाले खुश ,
आनवी च्या सहवासाने
भरून गेले सारे घर
प्रत्येकजण करतो माया
आनवी आपली भाग्यवान .
कविता : संजय होनकळस
०५.०८.२०. निगडी , पुणे .