अम्मांचा आशिर्वाद
ती तरी गोष्टींचे
होतो जेव्हां साक्षीदार
पाठीमागे नक्कीच असतात
मोठ्या विभूतींचे आशीर्वाद
बळ येते कोठून एवढे
सामर्थ्याने पेलण्या जवाबदारी
चांगले करीत चालण्या नित्य
गुरूंची प्रेरणा संचारते अंगी
किती समजावे स्वतःला भाग्यशाली
समाधानाचे सुख दरवळते अंतरी
जगण्याला हवे काय आता
सर्वस्वाच्या पायी दररोज हजेरी .
प्रकाशाचा दीप समोरी
अध्यात्माचे निकेतन भोवती
उन्नतीच्या मार्गी कर्म आचरणे
गुरू सेवेचे कर्तव्य कार्य होय ...
संजय होनकळस
२१.०८.२०