श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
" जय गणेश "
जय गणेश उच्चारता विघ्न दूर होई
सुख समृद्धीची वार्ता कानी येई
संघटित होण्या तू देतो सद्बुद्धी
कार्य करण्याचे बळ येते अंगी ,
सत्कार्य होणे हिच इच्छा तूझी
उपेक्षितांना आसरा देण्या कटिबद्ध आम्ही
दान सेवा मदत करू पुष्टी आधी
आरोग्य शिक्षण देवू सर्वोतोपरी ,
कला प्रसारक ज्ञानाचा तू स्वामी
उत्साहाला जोड समाज उत्कर्षाची
पंचतत्वांना संभाळण्या दे सर्वा बुध्दी
उभारी मिळते जीवनी आनंदाची ,
नवसाला पावतो अशी ख्याती त्याची
असे जगी किर्ती दगडूशेठ गणपतीची
भारतीय परंपरेचा वारसा संस्कारी
जय गणेश नाम कल्याणकारी ...
© कवि : संजय होनकळस