कविता : ' अल्लड '
होता अल्लड
भासते बालिश
मनसोक्त जगण्याची
धरते मी कास ...
सारे घेते मी
वेगळ्या दृष्टिकोनातून
उत्साहाने निभावताना
नेहमी अनुभवते बालपण ...
मैदानी खेळांसोबत
आठवतो भातुकलीचा डाव
मोठे असूनही एकरुप होऊन जाता
कामात रमून जाते मी सहज ...
निसर्गाला देवून प्रतिसाद
भावनांचा पिसारा घेते मी फुलवून
मौलिक प्राप्त होते आयुष्यात
सौख्याने संसार खुलवित ...
' बालपण ' हाच हिरा
बाळगते मी जीवनात
निरागसतेचा तो पैलू
आनंद देतो मज क्षण क्षण ...
© कवी : संजय होनकळस
निगडी पुणे ,९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा