' हिंदूस्थानी तिरंगा '
तिरंगा उंचविताना
आनंदाची उत्पत्ती होते ,
देशाभिमानाची स्तुती सुमने
आपसूकच ओठी येते ,
अभिमानाने राष्ट्रगीत गाताना
रोमारोमात चैतन्य भरते ,
उत्साहाने सारे तनमन
ह्रदय ही फुलून येते ,
स्वातंत्र्यसैनिक वंदनीय
प्रेरणा स्थान आपले ,
स्वातंत्र्यतेचा जागर
देशभक्ती जागृत करते ,
संस्कृती - विविधतेत नटलेला
भारत देश आपला ,
एकसंघ ठेवण्याचा
श्र्वास ध्यास सर्वांचा ,
वंदे मातरम् नाद
जयघोष जगण्याचा ,
गतिशील राहो सदा
अशोक चक्र बोध देतो पहा ,
गौरवशाली इतिहास आपला
अहिंसा संदेश देणारा ,
आकाशी डौलाने फडकतो
भारतीय तिरंगा शांती प्रगतीचा...
© कवी : संजय होनकळस
११/०८/२०२२ , निगडी, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा