" वंदे मातरम् उच्चारण "
अविट मधुर ह्रदयी पाझर
अमृत वंदे मातरम्
आत्मा ही करतो नमन
शब्दाची ती ताकद
वंदे मातरम् उच्चारण || १ ||
वंदनीय पूजनीय
मातृभूमी प्रति आदर
कर्तृत्वाला दिशादर्शक
बलिदानाचे सुख समर्पक
वंदे मातरम् उच्चारण || २ ||
देशभक्ती संचारते रक्तात
रक्षणा भिनतो अंगी ध्यास
भू माती कुंकुम तिलक
भाग्यशाली तो साधक
वंदे मातरम् उच्चारण || ३ ||
वैभव गौरवशाली इतिहास
हिंदूस्थान जीवन पध्दती बोधक
चैतन्याचे स्फूरण वंदे मातरम्
अभिमानाने उंचावते मान
वंदे मातरम् उच्चारण || ४ ||
© कवी : संजय होनकळस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा