वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव आपणांस लाभो हो
आनंदाचा हा क्षण नेहमी
जीवनात आपल्या येवो हो || १ || ...
आरोग्य धनसंपदे सोबत
उत्कर्ष किर्ती वाढो हो
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव आपणांस लाभो हो || २ || ...
स्नेह जिव्हाळा नाती गोती
उत्साहाने पुलकित होवो हो
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव आपणांस लाभो हो || ३ || ...
आशिष औक्षण शुभकामना
प्रभू पालकाचे नियमित लाभो हो
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव आपणांस लाभो हो || ४ || ...
जगत जननी चे ऋण फेडण्या
संधी आपणांस लाभो हो
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव आपणांस लाभो हो || ५ || ...
कवी : संजय होनकळस
२६.८.२२ निगडी पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा