सदैव पुढे तुझा
मदतीचा हात ...
चेहऱ्यावर हसू
बोलणे तुझे मधूर ...
लाभो सर्व तुजला
जे आहे मनी ...
अभिनंदन करण्या
येवू लगबगीने सारे आम्ही ...
सहवास लाभतो तुझा
मित्रत्वासाठी मानतो आभार आम्ही ...
शतकाची वाटचाल आहे
नक्की तुझ्या नशिबी ...
५० ....१०० व्या वाढ दिवसांसाठी
हार्दिक शुभेच्छा आता पासूनच देतो आम्ही ...
कवी मित्र : संजय होनकळस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा