सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

आनंदघन मित्र.

"  आनंदघन  मित्र " 
आभार  निर्माण  कर्त्याचे
दिले  आपणांस  हे  भाग्य 
जाणून  घेतल्यानंतर  उमजले  
किती  मोठी  लाभली  भेट ...
पंचतत्वांसारखे  भरीव 
पंचेद्रियेसम  अनमोल 
जडते  अमूल्य  ओढ
ज्ञानी  मुक्त  विद्यापीठ  
सदैव  तत्पर  
मनकवडा  एक 
जीवनाला  अविभाज्य  घटक 
ह्रदयात  स्थानापन्न  
आनंदघन  प्रतिक 
भूषणे  कैक 
संबोधन   मित्र - यार - सखा 
माझा  एक  दोस्त  ...
© कवी  :  संजय होनकळस 
०७/०८/२०२२ निगडी पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...