ऋणानुबंध P2"
कोऱ्या कागदाची
भेट झाली पेनाशी
झाले उतावीळ
दोघेही संवादासाठी ,
सुरूवात केली तशी
शब्द लिखित प्रगटले
पेनाच्या कौशल्य सहाय्याने
कागदाला सजवले ,
लिखिताला अर्थ तसे
कागदाचे महत्व वाढले
ज्यानी दोघांना एकत्र आणले
त्यालाही मोल मिळाले ,
उपयुक्तता प्रत्येकाची तशी
आविष्कारी रूपाने वाढले
नाविन्याची संधी मिळताच
समृद्धीच्या वाटेने बहरले ...
कागद पेनाने जपले
ऋणानुबंध कायमचे
सरस्वतीच्या वरदहस्ताने
ज्ञानी झाले जग कायमचे ...
© कवी : संजय होनकळस
२५/०५/२०२२ निगडी पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा