बुधवार, २१ मे, २०२५

" वनराईतील विसावा ते शहरीकरणाचे वास्तव "

" वनराईतील  विसावा  ते  शहरीकरणाचे  वास्तव  " 

हे  झाड  ठरले  होते  भाग्यवान 
त्या  सावलीत  बसून  गेले  होते
श्री कृष्ण  प्रभू  रामचंद्र  साधू  संत 
कधी  काळी  माझा  पंजा  आजा  बाप ...
पंचमहाभूतांची  प्रसन्नता  अनुभवली  होती  त्यांनी 
ते  भाग्य  आता  येणार  नाही  अनेकांच्या  नशिबात
पशुपक्षी  जनावरांच्या  या  रम्य  वास्तव्यास्थळी
होत  आहे  नवीन  वसाहत   टोले  जंग  इमारत ...
हिरव्या  वनराईचा  तो  निसर्ग  समृद्ध  परिसर
देत  होता  सावली  विसावा  जाणार  येणाऱ्यांस 
बदलत्या  काळाचे  चांगले  वाईट  परिणाम 
लागू  पडतील  पर्यावरणासोबत  जीवनसारणीवर ...

© ®  कवी  :  संजय होनकळस, पुणे 
१५/०५/२५ , फोन ९८५००३९७६६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...