मनाची ओढ थांबता थांबेना
पंढरीची वाट खुणावते पावलांना ,
सावळा श्रीहरी भावतो सर्वांना
संतांची शिकवण ज्ञान देते मना ,
वैष्णवांचा मेळा वाटतो आपला
पताका घेवून नाचतो भक्त हरीचा ,
भेदाभेद नाही सर्व सोबती सखा
प्रत्येकांच्या ओठी ओवी अभंगांच्या रचना ,
इंद्रायणी चंद्रभागेत सोडून द्यावा व्यथा
तृप्त व्हावे चक्षु अंतरंग निर्मळ पुन्हा ,
दिंडीतील रिंगण देवळाचा कळस पहावा
ध्यास एक दर्शन व्हावे पांडुरंगाचे एकदा ,
राम कृष्ण हरी सर्व व्यापून उभा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल मुखी म्हणा ,
आषाढी कार्तिकी वारकऱ्यांचा सण हा मोठा
ज्ञानोबा तुकाराम बोल उच्चारता सुख लाभते जीवा .
© कवि : संजय होनकळस , पुणे
०५/०७/२४ फोन : ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा