आघाडीचा फलंदाज तो ( १९७१ साली सुरुवात )
१२५ कसोटी सामना खेळला ( १९८७ साली निवृत्ती ),
२९ शतकांना मागे टाकून ( सर डॉन ब्रॅडमन )
३४ शंभरीचा प्रथम राजा झाला ,
धावा १,५०,१००,२०० करीत त्याने
सर्वात आधी १०,००० धावांचा इतिहास रचला ,
कसोटी सामने खेळताना सरासरी
५१.१३ ने तो धावा करीत राहिला ,
क्षेत्ररक्षणात ही चपळ - दक्ष राहून
१०० झेल झेलणारा मानकरी तो ठरला ,
एकदिवसीय १०३ सामने खेळताना
१९८३ चा विश्र्व चषक जिंकून आणला ,
चमकदार कामगिरी साठी १९७५ साली अर्जून पुरस्कार व
पद्म भूषण १९८० साली भारत सरकारने प्रदान केला ,
विस्डेन पुरस्काराचा १९८० मध्ये तसा
२००९ मध्ये ही आय सी सी सन्मानित तो झाला ,
गावस्कर - बॉर्डर नावाचा चषक सामना
त्यांच्या सन्मानार्थ क्रिकेट समितीने चालू केला ,
उंचपुऱ्या गोलंदाजांना समोर धैर्यवान हा
५'६" उंचीचा असूनही ' लिटील मास्टर ' ने नावाजला गेला ,
सनी म्हणून खेळाडूत प्रसिद्ध असताना
समीक्षक समालोचनातही आता तो निपुण ठरला ,
आत्मचरित्र सनी डेज , चित्रपटात गीत गाऊन ( १० जुलै २४ ला )
७५ री साजरी करताना शंभरी कडे आनंदाने निघाला ...
© शब्द पुष्प : संजय होनकळस , पुणे
०९/०७/२०२४ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा