शनिवार, २७ जुलै, २०२४

डोंगर पावसाचा खेळ "

" डोंगर पावसाचा खेळ " 
पावसाळ्यात  ढग डोंगरावर  खेळण्यास  उतरतो 
येताच  क्षणी  त्याला  बाष्पाने  आच्छादीत करतो 
डोंगर ही त्यांची  खोड काढीत गारवा निर्माण करतो 
खट्याळ ढग डोंगराला  पावसाने न्हावू माखू  घालतो 
डोंगर ही मग पावसाला धबधब्याच्या रुपी खाली ढकलतो 
 तुषार  हवेत  मस्त  उडत  नाचत  इंद्रधनुष्यात  प्रगटतो 
अधे मधे ढग दऱ्याखोऱ्यात उतरुन लपतो 
डोंगराला तो  झाकून स्वतःहाचेच अस्तित्व दाखवतो 
डोंगर ही  पावसाला  गुपचूप अंतर्गत  सामावुन  घेतो 
झऱ्या रुपी  त्याला  पाझरत  महिनोन्महिने ठेवतो 
ह्या खेळात  डोंगर  हिरवागार टवटवीत  होतो 
पावसाळ्यात  डोंगर  आभाराने  त्याला  फुले भेट  देतो 
हे भाग्याचे क्षण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतो 
दरवर्षी  दोघांना मनसोक्त खेळण्यासाठी परवानगी असते 
निसर्ग माता  हे  पाहून  उल्हासित आनंदित  होते ...
© कवी : संजय होनकळस , पुणे 
१९/०७/२४ फोन ९८५००३९७६६ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...