मंगळवार, २ मार्च, २०२१

सौ , वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा

💐 वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂
 " सौ चा वाढदिवस  " 
सौ चा वाढदिवस  म्हणजे 
फर्माईश  चा  दिवस  ...
तिची  मर्जी  राखण्यात  
उडते  श्रीची  तारांबळ  , 
मूड  रहावा  चांगला  म्हणून 
धावपळीत  श्रीला  लागतो  दम , 
काय  आणावे  प्रेसेंट  तिला 
चक्रावून  जाते  श्री चे  मन , 
परफुम , ज्वेलरी , साडी 
कंफुझ  होते  डिसिजन , 
हॉटेलिंग चालेल की फिरणे दूरवर 
विचारावे कसे ह्याचे होत  नाही  आकलन , 
पाहून  बावरलेला  चेहरा  मग 
तीच  घेते  सारे  सांभाळून ,
बजेट सॅनक्शन करून  वर  
सूचना  देते   खुदकन  हसून , 
प्रेमाचा  ऐकणारा  नवरा  आपला 
हे  तीच  घेते  मोठया  मनाने  समजून , 
काहीही  म्हणा  तीच  आहे  होममिनिस्टर 
संसार  करावा  प्रेमाने  समरस  होवून    ,
भाग्य  उजळते  प्रत्येक  श्री  चे  
अर्थ  येतो  जगण्याला  सौ  आहे  म्हणून  ,
सौ  ला  देवूयात  वाढदिवसाच्या  शुभेच्छा
न  विसरता  प्रेमाच्या  खास  शैलीत  वागून  ...
💐🎂 

 कवी : संजय  होनकळस  
  ०१.०३.२१  निगडी , पुणे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...