शनिवार, २७ जुलै, २०२४

कल्पकते साठीचे पारितोषिक "


" कल्पकते साठीचे  पारितोषिक "
एकांतात असताना मजला 
कल्पकतेने  खेळण्यास बोलविले 
आणि सुचविले ,
जे आहे तुजपाशी  किंवा  आजूबाजूशी 
त्यातून काय करुन दाखवशील ? 
पाहू आज , हवंतर परिक्षा समज  ...
खरंच  मी  निरखून  पाहिले  जेव्हा 
थोडा विचार हि  केला 
मावळत्या  सूर्याला  मी  केंद्रबिंदू  ठरविले , 
जास्वंदीच्या  तुऱ्यात  बसवून  चमकताना  पाहिले 
एका  फुलाला  लटकून  दिवा  बनवून  दाखविले 
पानावर ओघळणारे  सोनेरी  दवबिंदू  टिपून  घेतले 
झोपाळ्यावर  झूलताना  हातात  त्यास  झूलविले 
हिरव्या  पानाच्या  टोकावर  सूर्य फूल  बनविले 
फुलाच्या डोक्यावर घेऊन  प्रतिबिंब खाली  पाडले 
क्षितिजाच्या  कक्षेतून  पाण्यात  उतरुन त्यास खूलविले 
आभासी करित त्याला  फुलदाणीत सजविले 
हे सर्व करताना मला खूप भारी वाटले ,
खेळताना खेळ असा  मला  भारावले 
हे पाहून सारे कल्पकतेने मला  
नव्या  दृष्टिकोनातून  पाहण्यासाठीचे  
आनंदाचे पारितोषिक दिले...
रचना : संजय होनकळस , पुणे 
२१/०७/२४ फोन ९८५००३९७६६ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...