गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

" लपंडावाचा खेळ "

"  लपंडावाचा  खेळ " 

पावसाळ्यात  सुर्य  नारायण
लपाछपीचा  डाव  खेळतो 
काळ्या  ढगा  आड  लपतो 
कधी  फक्त  किरणांनाच  धाडतो ,

डावामध्ये  या  कधी  वारा  
कधी  पाऊस  राज्य  घेतो 
धरतीला  सूट  देवून  साऱ्यांचा
चार  महिने  खेळ  चालतो ,

जेव्हा  श्रावण  सुरू  होतो 
सरींना  अधूनमधून  बरसण्यास  सांगतो 
ऊन  पावसाच्या  खेळामध्ये 
आभाळ   इंद्रधनुंनी   छान  सजवितो ,

हिरवेगार  गालिचे  फुले  फुलवितो 
धरतीच्या  श्रृंगाराला  सोनेरी  साज  देतो 
निसर्ग  ऋतू  खेळाचे  नियोजन  करीत 
लपंडाव  जीवसृष्टीस  भूरळ  पाडतो ...

© ® कवी :  संजय होनकळस, पुणे 
१२/०७/२५ फोन : ९८५००३९७६६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...