" आपसूकच "
का कसे उत्साहाने आपसूकच
उतावीळ मन पहाटे फिरण्यास
खुणावणाऱ्या डोंगर माथा दरी पठार
गुज गोष्टी निसर्गाशी करण्यास ,
पाऊल वाटांवर झाडी करती स्वागत
पक्षी करती किलबिल पाहून पक्षी प्रेमींस
रानफुले डोलती वाऱ्याच्या झूळूक समवेत
कोवळे ऊन घेऊन येती ऊर्जा भटकंतीस ,
वार्ताहर ढग सांगती बातमी पंचक्रोशीतील खास
विहारणारे पक्षी आणती संदेश नातेमंडळींस
परिसरातील समृद्धीने तन मन होती प्रफुल्लित
भेटीगाठींच्या किमयाने आनंद बिलगती फिरणाऱ्यास ...
© ® कवी : संजय होनकळस , पुणे ,
१३ जुलै २५ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा