" प्राणवायूचा दाता वृक्ष "
श्वासांसाठी प्राणवायू
वृक्ष देतो प्राणीमात्रांस
उत्सर्जित वायूचे देखील
प्राणवायुत करतो निर्माण ,
निर्भर प्राणवायुवर सारे
तरी वृक्ष राहिले दुर्लक्षित
संवर्धन झाडांचे करण्यासाठी
उदासीनता दिसून येते जनमानसात ,
वृक्ष तोडीने बिघडते आहे
सध्याचे पृथ्वीवरील तापमान
निसर्गाचा ढळूण समतोल
प्रभावित झाले ऋतुमान ,
रोगराईचा वाढतोय प्रादुर्भाव
आयुष्यमानावर होतोय परिणाम
वेळीच वृक्षारोपण केले आता तर
निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून वाचेल.
© ® कवी : संजय होनकळस , पुणे
१७ जूलै २५ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा