" कविते कडून गझलेकडे "
साहित्य संपदा कार्यशाळा घेवून आली
कविते कडून गझल शेरोशायरी कडे ,
विद्या शारदेचे वंदन करीता राजन (सर)
कवी विद्यार्थी विचारांनी निघाले विद्यापीठाकडे ,
अक्षरांची अर्थपूर्ण शब्दे उमगली
मात्रांची उघडली लघु गुरू कवडे ,
मुक्तछंदातून प्रवास काव्याचा सुरू असताना
साचे बद्ध वृत्त रचनेतून निघाले गझलेकडे ,
काफिया रदीफ शेर ताल सुरांना लाभता
माधुर्याने झंकारले गझलेचे विविध रूपडे ,
साहित्यिक होवून हर एक कवी गझलकार
रसिकांना घेवून जातील जगण्यातील आनंदाकडे ...
© ® कवी : संजय होनकळस. पुणे
२६ - २९ जुलै २५ फोन ९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा