" मैत्रीचे वेगळे सत्व - तत्व "
मैत्रीमध्ये ...
वर्ण भेद नाही , जाती भेद नाही , भाषा वाद नाही ...
मैत्रीमध्ये ...
मूल्यमापन होत नाही , तुलना होत नाही
षड्रिपूला वाव नाही ...
मैत्रीमध्ये ...
वयाचे बंधन नाही , वेळ आड येत नाही ,
नाते संबंध लागत नाही ,
मैत्रीमध्ये ...
जेंडर सांगावे लागत नाही , व्यवहारीकता येत नाही , रक्तगट सारखा लागत नाही ,
मैत्रीमध्ये ...
असतो फक्त स्नेह , आणि विश्वासाच सत्व , मैत्री आणि मैत्रीच तत्व. ...
© ® कवी : संजय होनकळस, पुणे
३ ऑगस्ट २५ , फोन ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा