गुरुवार, २२ जून, २०२३

शहर

"  शहर " 
भुलभुलय्या  संपदात  रममाण  होण्या 
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
सुख सुविधा हव्या चांगल्या
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
स्वप्नांना साकारण्याचा मार्ग  
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
नावलौकिक मोठेपणा मिळवण्यासाठी
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
संधी असो वा मजबूरीचा वादा 
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
मुबलक पैसा  नको  हवा अमाप  ज्याला त्याला 
शहराकडे ओढा  प्रत्येकाचा ,
कुचुंबना तडजोडीचा पत्करतील मार्ग  सदा
तरी राहण्यासाठी 
शहराकडे ओढा प्रत्येकाचा , 
प्रदूषणाने आयुष्यमान होईल कमी तरी फिकीर कोणाला 
आम्ही पुढारलेलो म्हणण्यासाठी  
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ,
फॅशन गाडी हॉटेलिंग ऐश करण्या हवी मोकळीक सर्वांना 
शहराकडे ओढा प्रत्येकाचा ...

© कवी : संजय होनकळस 
३१/०५/२३  पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...