गुरुवार, २२ जून, २०२३

पृथ्वीचा पाचू

" पृथ्वीचा  पाचू " 

जंगल  हा  पृथ्वीचा 
पाचू  म्हणून  संबोधतो 
प्राणीमात्रांना  तो  स्वच्छंदी 
अंगाखांद्यावर  सांभाळतो , 
हिरव्या  वृक्षांनी  बहरताना 
रंगांची  उधळण  करतो 
फुले  फळे  वेलींनी  
तारुण्यात  सदा  राहतो ,
सहयोगी  म्हणून  मिरविताना 
जमिन आकाशाला जोडतो 
प्राणवायूचा  पोशिंदा  तो 
माणसाला जगण्या  सहाय्य  करतो ,
अनमोल  वनसंपदा  सदा 
सृष्टीचा  जीवन  सखा
युगानुयुगे  आश्रय  दाता 
सृष्टीचा  तो  दागिना ...
© कवी : संजय होनकळस 
३०/०४/२३ निगडी पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...