शुक्रवार, १५ मे, २०२०

आभासी की खरा हवा

आभासी की खरा  हवा ...

खरच आहे  सारे  हे 
आभासी  सुख  आता  बोचते ,
हरवलेल्या  संवादाचे 
मोल  आज  कळते ,

उणिवच होती ती जीणे
नाते विणने शिकविले होते 
एकमेकांत  मिसळुनी  खरे
' जगणे काय ते ' अनुभूविले होते , 

कधीच नव्हती  स्पर्धा -  इर्षा 
होती  आपलेपणाची  आशा 
तुटपुंज्या  सोयी  असूनही  तेव्हां
भागवल्या  एकमेकांच्या  गरजा , 

सांपत्तिक  रस्त्यावर  धावताना मात्र , आता 
मागे पडल्या आनंदाच्या छोट्या वाटा 
काय जगलो ? लिहावे म्हंटले तर 
कागद राहतो  नेहमी  अर्धा  कोरा ,

किती तरी प्रश्न उत्तरा विनाच आज ...
वेळेच्या  चक्रावलीत  मी , भरकटलो  मात्र , 
काय  हवे ?  किती हवे ?  या जगण्याला ...
आभासी -  खऱ्या जगण्याचा अर्थ आता तरी कळावा  . 

संजय होनकळस  . 🙏🌷 २४.3.२०२०
९८५००३९७६६ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...