शुक्रवार, १५ मे, २०२०

ललित : कायनेटिक होंडा

                              श्री 
" कायनेटिक होंडा  " 
तशी  प्रत्येकाची इच्छा असते , कॉलेज मध्ये  जावू  लागल्यावर  आपल्याकडे २ व्हीलर असावी , मित्रमंडळींच्या मध्ये जरा भाव खाता येईल  आणि  रुबाब काय तो  अनुभवता येईल . तेव्हा  अशी  इच्छा  पूर्ण  होईल असे वाटले नव्हते . 
पण  योग  मात्र  होता . 
पॉलिटेक्निक   कॉलेज  दीड  दोन  किलोमीटर  होते , पायी  जाणे येणे  तसे सोपे  होते , वाटेत  मित्र भेटायचे , गप्पा मारत कॉलेज -  घर  कधी  येत  असे  समजत देखील नव्हते . 
         दररोज  दुपारी कॉलेजच्या  लंच  टाइम  मध्ये घरी  जेवणासाठी  जाणे  व्हायचे  , जेवून  कॉलेज  लेक्चर  असेल तर  जाणे  व्हायचे . 
असेच  एकदा  डॉक्टर आजोबांना  ST  स्टँडवर  सोडण्यासाठी  गाडी  घेऊन  जाण्याचा योग  आला .
त्या दिवशी  नेमका  मामा  काही  कारणास्तव  घरी   नव्हता .  मला  विचारणा  झाली  , मी म्हंटले  मला जमेल पण नंतर  कॉलेज आहे .  आजोबा म्हणाले मला सोडून कॉलेज कर  आणि  कॉलेज  झाल्यावर  गाडी  व्यवस्थित  घरी  घेऊन  जा . 
हाच तो योग . मग काय ,  मी  आजोबांच्या  मागे बसून  स्टँडवर पोहचलो  , त्यांनी  मला  गाडी सुपूर्त केली , मी इतका आनंदित  झालो  की  बस ...
काळ्या  रंगाची , सोनेरी पट्टे  असलेली , ऑटोमॅटिक  गियर ची  गाडी  माझ्या  हातात  होती , ऑक्सेलेटर  पिळला की गाडी  सुसाट  पळायची .  मला  तरी  हवेत  चाललो की  काय असे  वाटले .  अंगात  थोडी  उर्मी  आली . 
कॉलेज च्या  गेटमधून  आत जाताच सर्वांचे लक्ष माझ्याच कडे  होते , प्रत्येक जण येऊन  विचारपूस करीत होता , 
माझा भाव थोडा वधारला होता . ' ऐट ' काय  ते  आपोआप माझ्या  कृतीतून  येत  होते . पण  हे  नकळत  होत  होते . काहींच्या नजरेत  माझी  इमेज  वाढली होती . त्यावेळी सरांच्या कडे फक्त  २ व्हीलर असायच्या , विद्यार्थ्यांकडे नाही . 
आजोबा - मामा यांचा  मुळे  हा  योग आला  होता . 
त्याकाळी जपानी तंत्रज्ञानाची  ऑटोमॅटिक  गाडी  चालवायला  मिळणे  म्हणजे  दुर्मिळ  योग . नंतर हा  योग बऱ्याच वेळा आला , पण पहिल्या  वेळेची  कॉलेज  मधील
  " कायनेटिक होंडा "  राईड   कायम लक्षात राहिली . आज ह्या  लातूर  मधील गोष्टीला  ३० वर्षे  होत आलीयेत . 

  संजय  होनकळस . 
  ९८५००३९७६६




        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...