🌷 श्री 🙏
' कविता - काव्य - गीत '
शब्द सागरातून उत्स्फुर्तते
कवितेची स्पंदनेरुपी लाट
मन भूमीला स्पर्शता
न्हाहून निघाले भाव ,
अलंकारीत शब्द जसे
शंख शिंपले मोती
काव्यशिड नाव विहारते
जसे जीवन प्रसंगी ,
शब्दांना मिळते झळाळी
चंद्र सुर्येसम प्रज्ञेची
क्षितिज भेटती अंतरंगी
कवितेचे स्फूरावे गुणगान ,
आल्हाद हवेवर स्वार
शब्दांची लय मंजुळ
मन हिंदोळ्यावर काव्याची
वृक्षहिरवी सावली किनार ,
शब्द प्रगटता संवादे
जीवनाची अविभाज्य रत्ने
गुंजन प्राणिमात्रास सदैव
शब्द आकारे गीतकार ...
🌿☘️ 📝 संजय होनकळस
२०.०५.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा