शुक्रवार, १५ मे, २०२०

प्रेमाच्या चारोळ्या



🌴🌻
प्रेमाच्या  लहरी 
उसळूनी  याव्यात 
मनाने  मनाला 
त्या  पोहचवाव्यात ...
🌱🌹
तसेही  तुझे  माझे  मन                                          एकमेकात  आहे  गुंतलेले               
उचकीसरशी  इश्श  म्हणताना 
तुझे  छान लाजणे  मी  जाणले . 

🌿🌷
आपल्या  पहिल्या  भेटीतच  
डोळ्यात  सामावून  घेतले  तुला 
दुरावा  कदाचित  आला जरी 
हेच भरपूर  जगण्यासाठी  मला .
☘️🌷
उगाच  आपण  झुरतो  
भेट  लवकरच  होणार 
प्रेमासाठी  ग्रीष्म  सोसल्यावर 
श्रावणसरी आपल्याला  भिजवणार .

📝🙏🌷 संजय होनकळस
२१/०४/२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...