रविवार, ३१ मे, २०२०

डू ~ ढु ~ म ... मुटका


  डू ~ ढु ~ म ... मुटका   " 

शेत  हिरवे  दूरपर्यंत 
उंच  दाट  झाडांतून  
पायवाट  वाकडीतीकटी अरुंद 
बांधावरून   पोहचते  सरळ 
दगडी  विहिरीच्या  भिंतीपर्यंत 

आकाशी  हिरवे  नितळ 
झऱ्याचे  पाणी  स्वच्छ अविरत 
कधी  खोल  - कधी  उथळ  काठ
उतरण्या  पाण्यात  पायऱ्या 
खाचा  कधी  बांधलेला  दोर 

पाहून  पाण्याला  होतो 
पोहणाऱ्याला  पोहण्याचा  मोह 
अंदाज  पाण्याच्या   खोलीचा   घेऊन 
मित्रमंडळींसोबत  काठावरून तयारीने 
उड्या  मारतो  प्रत्येकजण  पाठोपाठ 

जाणकार  मारतो  अंदाज  घेऊन  सूर  
नवख्याची  असते  बेडूक  उडी  हळूच 
शिकणारा  भोपळयासह  पोहतो  कडेलगत
पट्टीचा  काठावरून  मारतो  ' मुटका '
पाणी  उडते  विहिरी  बाहेर  डू ~ ढु ~ म ...

संजय होनकळस
२६.०५.२०

   

















  

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...