रविवार, ३१ मे, २०२०

हक्काचा मन कवडा जोडीदार


 " हक्काचा  मन  कवडा  जोडीदार " 

हे उमजलंय मला ...
जोडीदार  असला  की
जीवन  सोपं  होतं ...
आवडीनिवडीचं  दोघानांही
जास्तीच  मिळतं ...
प्रसंगारूप  व्यक्त  होऊन 
जमवून  पाहता  येतं  ...
स्वप्नांना  सत्यात आणताना 
छानसं  नातं बहरतं ... 
प्रेम  रंगांना  वेगवेगळ्या  
छटांचं  इंद्रधनू  फुलतं  ...
आनंदासाठी  मनकवडं
जिवलग  मित्रत्व  लाभतं  ...
परिपूर्ण  आयुष्य  लाभण्या 
हक्काचं  माणूस  मिळतं  ...

पद्मा  ~  संजय होनकळस 
३०.०५.२० 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...