शुक्रवार, १५ मे, २०२०

कोरोनासाठी सावधगिरी

जर  मला  विचाराल की
असशील  का  रे  तू  उद्या  घरी ? 
मी  नक्कीच  सांगेल 
होय  असेल  मी  .
आणि  तू  पण ...
मी  जसा  घरी  राहतो  तसा 
तू  घरी  राहिलास  तर ...
  ' शहाण्या  माणसा  '

पण  जर  तू  ...
अधर्माने   वागलास ,
नियमांच  उल्लंघन  केलस ,
बेफिकिरी  तुझ्या  वागण्यात  आली ,
खोट बोलून  दिशाभूल  केलीस ,
संकटाच  गांभीर्य  घेतलं  नाहीस , 
तर ...

कोरोना  बाधित्यांच्यामध्ये 
प्रथम  तू  येवून  तुझी  लागण
तुझ्याबरोबर  राहिल्याने  
तुझे  कुटुंब , सहकारी ,
तुझे  आजूबाजूचे , चाळीतील ,
अपार्टमेंट मधील गावातील , नगरातील , 
देशातील नागरिकांचे  जीवन  उध्वस्त  होईल .
तुझ्या  एका  चुकीची  शिक्षा  
दुसऱ्यांचे  जीवन  संपवतील , 

तुझ्या  हट्टी  आणि  अज्ञानामुळे ,
तू  विषाणू संसर्ग  बाधित  होशील ,
तसाच इकडून  तिकडे  फिरत राहिलास  तर ,
जो  की  मृत्यूचे  थैमान घालणारा  
विषाणू  प्रसारक  म्हणून
हीनवला  जाशिल ,  बदनाम  होशील .
असे म्हंटलेले  आवडेल  तुला  घरच्यांना ? 

तू  आणि  तुझ्या  सारख्यांमुळे 
सरकारी  कर्मचारी , पोलीस , 
डॉक्टर , नर्स , ब्रदर्स , 
स्वच्छता  कर्मचारी ,
सर्व जण  दिवसरात्र  एक करून आधीच्या 
कोरोनाग्रस्त रुग्णांना औषधोपचार करीत 
त्रास सहन करीत  सेवा पुरवित आहेत - राहतील
कित्येक दिवस घरी न जाता 
फक्त  माणुसकीचे  कर्तव्य  मानून .   
त्यांनी  किती  दिवस असे  काम करायचे ? 

लॉकडाऊन असेच जास्त  वाढले  तर ...
अर्थव्यवस्था  कोलमडेल , 
नोकरी - छोटे - मोठे  व्यवसाय , 
शेती - आयात - निर्यात  थंडावेल , 
सर्वांचे  नुकसान  होईल .
शिक्षण ,  उन्नती , पोटापाण्याचा  प्रश्नाने 
देशाचे अतोनात नुकसान होईल .
कधी  हिशोब  करण्याचा  प्रयत्न केलाय ? 

जवळची  पुंजी  संपल्यावर काय ? 
प्रश्नांची  उत्तरे  अजून  माहिती  नाहीत .
आशावाद  असलेतरी  जगभरात 
नंतर  सुधारणा  होण्यास  वेळ  लागेल ...
ह्याचा  विचार  तरी  कधी  केलाय ? 

देशाचे  सजग  नागरिक  म्हणून  प्रत्येकाने 
लपवाछपवी  न  करता  जर  कोणाला 
लागण  झाली  असेल  तर  सामोरे  येवून 
उपचार घेऊन  बरे  होऊन  घरी  जावू  शकता  . 

नको  रे  असा  वेडया  सारखा  वागू  , 
भाजी , धान्य  घेण्यासाठी  नको  गर्दी  करू , 
सोशल  डिस्टन्स  पाळून  करू  सहकार्य 
शहाणपणाच  नातं  जोड  पाहू  आचारणाशी , 
लसीकरनाचे  प्रयत्न चालू  आहे  जगती 
काळजी  घेणे  हेच आहे  कर्तव्य  आधी ,
घरात  राहणं  सध्या  आहे  जरुरी 
कोरोनाचा  नाश  करू ,  दूर  राहूनि 
विजय  मिळवू  सर्व  मिळुनी .

संजय होनकळस
०८/०४/२०२०
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...