शुक्रवार, १५ मे, २०२०

पौगंडावस्थेतील ठेव

 '  पौगंडावस्थेतील ठेव  ' 

पौगंड  वयातील  ती  ठेव 
आहे  खूप  अनमोल 
आकर्षण  म्हणा  किंव्हा  
अजाणत  प्रेम , 

सृष्टी  ने  प्रत्येक  सजीवाला
दिलेलं  आहे  अनमोल  बीज 
हृदयात  असत  कायमच 
मन  निपजत  आवडीनं  आजीवन ,

तारुण्यात  पर्याय  येतात  खूप 
व्यवहारी  जग  ठेवीला  ठेवत  झाकून 
आतून  येतो  मग  आवाज 
बीज  फुलवेल  तुझे  जीवन , 

स्वप्नावत  देते  साथ  जास्त 
आवडी  निवडीत  देते  कौल 
एकांतात  अवतरते  आभासीरुपात
आतल्या  ठेवीच  ते  सजीवपण ,

काव्य , लेखन , चित्र , संवाद 
प्रभाव  असतो  निःसंशय 
तो - ती चे  ठेवीरुपी  अस्तित्व 
जीवन  करते  प्रफुल्लित  , 

उत्सुकता , इच्छा , एक  झलक 
जाणून  घ्यावे  एकमेकांस 
परत  जावे  पौगंडावस्थेत 
सांगावे ,  पहा  कसे  जपले  आहे  ठेवीस .

कवी : संजय होनकळस








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...