' अस्तिवाचे बेट '
नका हरवू देवू स्वतःला
सभोवतालच्या घेऱ्याला
कितीही आले प्रतिकूल प्रसंग
लढत रहा अस्तिव सिद्ध करण्याला ,
प्रोत्साहित करा सतत स्वतःला
सकारात्मक ऊर्जा असेल सोबतीला
धडपड करीत निघेल मार्ग
ध्येया पर्यंत पोहचण्याला ,
हमखास मिळेल जेव्हां साध्य
उजळून निघेल आसमंत
अस्तित्वाने फुलेल बेट
लाभेल मोल आनंदासह जीवनाला ,
होवून माध्यम चैतन्याचे
शोध आणा नावा रुपाला
देवू करा अनमोल साऱ्या जगला
तोच अस्तित्वाचा विजय समजा ...
© कवी : संजय होनकळस
१३.०९.२१ निगडी , पुणे , ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा