' जय गणेश '
छोटा भीम मोगली चिंट्टू पिंक्की
बाळ गोपाळ मंडळी सारी
चला चला सर्वां साठी
गणपती येवू लागले प्रत्येकाच्या घरी ,
मिरवणुकीत घेवून ढोल ताशा
लेझीम झान्झ घेवून मस्त नाचा ,
रंग कागद पाने फुले आणा
जमेल तसे घरोदारी सारे सजवा ,
स्वतः हाताने बाप्पा साठी मखर
सजावट करून कलाकुसर दाखवा ,
चौरंग समई अगरबत्ती लावून
दुर्वा कमळ लालजासवंदि बाप्पाला वहा ,
आरती श्लोक दररोज म्हणा
तयार होऊन पूजेसाठी एकत्र हजर रहा ,
मोदक खिरापत पौष्टीक प्रसाद खावा
मनोभावे पूजापाठ नित्य करा ,
भक्ती आशीर्वादे मिळेल बुद्धी
खेळण्यातही येईल स्फुर्ती भारी
उत्साहाला येईल उधाण भरती
मिळून सारे म्हणू ' गणपती बाप्पा मोरया आधी ' ...
© कवी : संजय होनकळस
१२.०९.२१ , निगडी , पुणे ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा