शिर्षक : ' कार्यभोग '
खरंच आहे हे
उंची गाठल्या शिवाय
दुनिया दिसत नाही ,
खारे पण पचविल्या शिवाय
जीवनात गोडवा
निर्माण होत नाही ,
सोसाट्याचा वारा
झेलल्याशिवाय ताठ उभे
राहता येत नाही ,
महात्म्य उपयुक्तता
निर्माण केल्याशिवाय
कोणीच जवळ करीत नाही ,
जुळवून घेताना
नित्याचाच संघर्ष
कोणालाच चुकला नाही ,
निसर्गातील प्रत्येकालाच
कार्यभोग लागू असल्याने तो
कोणालाच चुकला नाही ...
© कवी : संजय होनकळस
१०.०९.२१ निगडी पुणे
९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा