' रसिक पर्यटक '
गोल गोल धरती भोवती
चंद्र फिरतो कले कलेने रोज ,
चमकतात चांदण्या आकाशी
सागराला येते भरती ओहोटी प्रतिदिन
उमलतात रंग रूप बदलून ,
ढग बदलतात आकार चंचल होवून ,
खुलते रूप चंद्राचे पौर्णिमेचा होवून
फेसळतात लाटा उंच उसळी घेवून ,
त्रिवेणी संगम खुलतो एकत्र भेटून
शीतलता लाभते चंद्राच्या प्रकाशात ,
चमकते सागरी वाळू रत्न होवून
वारे वाहतात आल्हाद उबदार होवून ,
गवसते अकल्पित अशा वातावरणात
विसरते भान निसर्गाचेच होवून ,
नयनरम्य दृश्य करते मनाला प्रसन्न
अश्याच वाटेचा मी रसिक पर्यटक ...
© कवी : संजय होनकळस
१४.०९.२१ , निगडी , पुणे ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा