ये आज्जी , अगं मी येतोय गं , काय काय खेळणी आणली आहेस दाखवायचं हं , माझं नाव काय ठेवणार हे ठरलंय काय गं ?
छानसा पाळणा आणलाय ना ?
गुलाबी उशी , मऊमऊ बिछाना ,
पांघरण्याला तुझ्या साडीचा पदरशेला ,
सुवासिक पावडर , मॉलिश तेल ,
हे सर्व आवडेल मला ...
आधीच तयारी करशील तू
म्हणून सांगतोय हं तुला ,
बडबड गीते तू नक्की गाणार आहेस
छोट्या गोष्टी देखील मी ऐकणार आहे
हे तुझ्या माझ्यात आधीच ठरलंय हं ,
गोड गोड पापे तुला नक्की देणार
हे आपलं ठरलंय हं ...
ये आजी एकतेय ना गं ...
कवी : संजय होनकळस
१४.०७.२० , पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा